नाशिकसह महाराष्ट्रातील जिल्हा परिषद मालमत्तेचा हजारो कोटींचा घोटाळा ; गाडलेल्या फाईल्स उकरणार ;विधिमंडळात गौप्य स्फोट शक्य
नाशिकसह महाराष्ट्रातील जिल्हा परिषद मालमत्तेचा हजारो कोटींचा घोटाळा ;
गाडलेल्या फाईल्स उकरणार ;विधिमंडळात गौप्य स्फोट शक्य
☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
मराठी संस्कृती जतन करा
………………………………………………………………………….
कुमार कडलग /नाशिक
ब्रिटिशांच्या गुलामगिरीचे साखळदंड तोडून भारत स्वतंत्र झाल्यानंतर हजारो कोटींच्या सार्वजनिक, शासकीय मालमत्ता तत्कालीन गाव पुढारी आणि प्रशासनाने हडप केल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्हा परिषद सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिक्षण, आरोग्य पशु संवर्धन, समाजकल्याण बांधकाम लघु पाट बंधारे, सध्याचे एकात्मिक बाल विकास अशा विविध विभागाचा मालकी हक्क असलेल्या तसेच गायरान, गावठाण, बखळ जागा, बांधीव इमारती परस्पर विकल्या गेल्यात किंबहुना लोकल बोर्डाचे तत्कालीन अध्यक्ष, शिक्षण समितीच्या अध्यक्षांनी स्वतःच्या लाभात नावावर करून घेतल्याचे एका पाहणीत आढळून आले आहे.
नाशिक जिल्हा परिषद प्रमाणेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा परिषदेचा मालकी हक्क असलेल्या काही हजार एकर भूखंड आणि कोट्यावधीच्या बखळ जागा, जमीनीची अशा प्रकारे परस्पर विल्हेवाट लावल्याची शंका उपस्थित केली जात आहे.
शासकीय उतरंड:
ग्रामसेवक -तलाठी
मंडळ अधिकारी- विस्तार अधिकारी (ग्रापं)
Advertisementगटविकास अधिकारी -तहसीलदार
उप मुख्य कार्यकारी अधिकारी -उपविभागीय अधिकारी( प्रांत )
मुख्य कार्यकारी अधिकारी -जिल्हाधिकारी
या सर्वांवर अंकुश असतो, विभागीय आयुक्तांचा. शासकीय कामकाजात एवढी सूक्ष्म उतरंड सक्रिय असतांना तत्कालीन गाव पुढाऱ्यांनी जिल्हा परिषद पर्यायाने महाराष्ट्र शासनाच्या डोळ्यात धूळ फेकून हजारो कोटींची सार्वजनिक मालमत्ता हडप केली. शासकीय झारीतील शुक्राचार्य या कुप्रक्रियेत सहभागी असल्याशिवाय कार्यभाग तडीस जाणे अशक्य. म्हणूनच तत्कालीन प्रशासनाचीही चौकशी अपरिहार्य ठरू शकते.
या संदर्भात भारत निर्मल ग्रुप या धर्म, जात भ्रष्टाचार, अत्याचार मुक्त भारत हे उद्दिष्ट घेऊन स्थापन झालेल्या संघटनेने याविषयी भूमिका घेतली असून लवकरच या मुद्यावर महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यव्यापी चळवळ उभी केली जाणार आहे.
निर्मल भारत ग्रुप तर्फे विविध पक्षांच्या विधिमंडळ सदस्यांनाही या विषयी अवगत केले जाणार असून,हजारो कोटींचा हा घोटाळा विधिमंडळाच्या पटलांवर आणून गाडलेल्या फाईल्स उकरण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. या संदर्भात कुणाला काही माहिती द्यायची असल्यास [email protected] यावर संपर्क साधावा,असे आवाहन संघटनेने केले आहे.
लवकरच : नाशिक जिल्ह्यातील एक माजी आमदार केंद्रीय गृहमंत्रालय, अर्थ मंत्रालयाच्या रडार वर ;
भारत निर्मल ग्रुपच्या तक्रारीची गंभीर दखल