स्वांतत्र्य दिनानिमित्त युवा ग्रामीण पत्रकार संघटना च्या वतीने गोटुंबे आखाडा येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान*. पत्रकार संघाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य करणार : आर.आर.जाधव
*स्वांतत्र्य दिनानिमित्त युवा ग्रामीण पत्रकार संघटना च्या वतीने गोटुंबे आखाडा येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान*.
पत्रकार संघाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य करणार : आर.आर.जाधव
युनूस शेख. राहुरी प्रतिनिधी :
राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे आज 15 ऑगस्ट स्वांतत्र्य दिनाचे औचित्य साधून युवा ग्रामीण पत्रकार संघटना च्या वतीने गोटुंबे आखाडा या शाळेतील 2023 -24 या शैक्षणीक वर्षातील इयत्ता 1 ली 7 वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन प्रोत्साहन मिळवण्यासाठी ट्रॉफी, मेडल व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते मधुकर साळवे हे होते तर कार्यक्रमासाठी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हा सचिव राजेंद्र म्हसे, राहुरी तालुका अध्यक्ष अशोक मंडलिक, सचिव आर.आर.जाधव, सह संघटक रमेश खेमनर,युनूस शेख,सदस्य प्रमोद डफळ व नाना जोशी, उमेश बाचकर व BPS न्यूजचे पत्रकार कृष्णा गायकवाड, जय बाबाचे पत्रकार मनोज हासे, राहुरी फोटोग्राफर संघटना अध्यक्ष जालिंदर गडधे, अंकुश दवणे, सचिन सोळसे, किरण खेमनर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब दाभाडे, प्रहारचे दत्तात्रय खेमनर, मुकींदा शिंदे, राहुरी खुर्द ग्रामपंचायतचे उपसरपंच तुकाराम बाचकर, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी पवार, मीनाक्षी घोकसे, मनीषा शेंडे, प्राजक्ता शेटे, अंगणवाडी सेविका यांच्यासह पालकवर्ग व मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे सचिव आर.आर.जाधव यांनी केले व सूत्र संचालन श्रीमती अनिता मोरे यांनी केले व कार्यक्रमाचे आभार श्रीमती राणीताई साळवे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शाळेच्या मुख्यध्यापीका जपकर मॅडम, कल्हापुरे मॅडम, निमसे मॅडम, कमळापूर मॅडम, मोरे मॅडम, साळवे मॅडम, कांबळे मॅडम व दुधाडे मॅडम या महिला शिक्षकांनी अथक परीश्रम घेतले.