देव मामलेदार यात्रेत रंगणार कुस्तीची दंगल! लाखोंच्या बक्षीसांची खैरात
देव मामलेदार यात्रेत रंगणार कुस्तीची दंगल!
लाखोंच्या बक्षीसांची खैरात
☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
मराठी संस्कृती जतन करा
……………………………………………………………………………..
भैय्यासाहेब माळी, सटाणा
सटाणा येथे संत शिरोमणी देव मामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या 137 व्या पुण्यतिथी निमित्त सालाबादाप्रमाणे सफला एकादशीच्या दिवसापासून पंधरा दिवस यात्रा भरत असते. देवमामलेदार देवस्थान ट्रस्ट कडून दरवर्षी कुस्त्या भरवल्या जातात.यावेळी सोमवार दिनांक ३० रोजी कुस्तीची दंगल आराम नदीच्या पत्रात भरवण्यात येणार आहे. त्यासाठी देवस्थान ट्रस्ट कडून जय्यत तयारी केली जात आहे. यशवंत व्यायाम शाळा ट्रस्ट यांच्या कडून कुस्तीचे नियोजन केले जाते. तसेच बाहेर बाहेरगावातील पहिलवानाना कुस्तीचे निमंत्रण दिले जाते. कुस्तीच्या स्पर्थेत कोल्हपुर,सांगली,बीड,आबेजोगाई,धुळे, नंदुरबार ,नाशिक,मालेगाव,व सटाणा परिसरातून पहिलवान येत असतात व येथील कुस्तीच्या दंगलीत मोठ्या प्रमाणात सहभाग घेत असतात. कोणता पहिलवान कोणाला आणि कसा चीतपट करतो हे बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात कुस्ती प्रेमींची गर्दी होत असते. यासाठी सटाणा पोलीस स्टेशन कडून चोक बंदोबस्त ठेवला जातो,कुस्तीन मध्ये पहिले नंबरचे बक्षिस एक लाख रुपयाचे असते तर दुसऱ्या नंबरचे बक्षिस पन्नास हजारचे असते. तर तिसऱ्या नंबरचे बक्षीश पंचवीस हजार रुपयाचे असते तर काही कृस्ती प्रेमींकडून हि बक्षिसे दिली जातात. कुस्ती आखाड्याचे उदघाटन तहसीलदार कैलास चावडे याच्या हस्ते होणार आहे. तर यावेळी देव मामलेदार ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, माजी नगरअध्यक्ष सुनील मोरे,यशवंत व्यायाम शाळा ट्रस्टचे अध्यक्ष अनिल पाकळे,निलेश पाकळे, अनिल सोनवणे, मनोज वाघ तसेच नगरसेवक,प्रतिष्टीत मंडळी व पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार उपस्थित असतील, तरी पंचक्रोशीतील नागरिकांनी सहभाग नोंदवावा तसेच उपस्थितांनी पहिलवानांचे व आयोजकांचा उत्साह वाढवावा असे आवाहन देव मामलेदार यशवंत राव महाराज देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.