क्राईम

नांदूर शिंगोटे येथे गाव चलो अभियान; शेकडो युवकांनी केला भाजप प्रवेश


नांदूर शिंगोटे येथे गाव चलो अभियान;

 

शेकडो युवकांनी केला भाजप प्रवेश

 

 

सिन्नर प्रतिनिधी

बुधवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२४ रोजी तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे असंख्य युवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

Advertisement

जिल्हा चिटणीस इंजि.सौ.मिराताई भाबड -सानप यांच्या नेतृत्वाखाली भाजपा जिल्हा अध्यक्ष सुनील बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली,युवा जिल्हा अध्यक्ष योगेश बर्डे,सिन्नर विधानसभा विस्तारक आदित्य केळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला . यावेळी जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, विधानसभा प्रमुख जयंत आव्हाड, जेष्ठ नेते बाळासाहेब हांडे,भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र उपाध्यक्ष मुकुंद काकड, भारतीय जनता पार्टी तालुका सरचिटणीस रामदास भोर,उपअध्यक्ष विजय शेळके , सिन्नर तालुका शहर अध्यक्ष मुकूंद खर्जे, सजन सांगळे,प्रशांत सानप ,पंडित कांबळे, उपस्थित होते.या सर्वांच्या उपस्थितीत दीपक भरत सानप,दत्तात्रय विठोबा सानप,रामदास सानप मानोरी,बाबासाहेब भाऊसाहेब वर्पे,दिलीप भाऊसाहेब शेळके,भारत भाबड, सखाराम दौंड, पप्पू बैरागी,रमेश शेळके, दीपक शेळके,दीपक सानप,दीपक शिंदे, प्रशांत शेळके, महेंद्र शेळके, आदेश लोकरे, अजिंक्य वाघ,मिलिंद वाकचौरे, राहुल शेळके, ऋतिक गोसावी, प्रवीण कवाडे प्रतीक गोसावी प्रवीण शेळके बाळासाहेब वाकचौरे आदी युवकांनी पक्ष प्रवेश केला. दिलीप भाऊसाहेब शेळके यांना युवा उपजिल्हाध्यक्ष म्हणून युवा जिल्हाध्यक्ष योगेश बर्डे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी जिल्हा अध्यक्ष सुनील बच्छाव आणि सर्व भाजपा पदाधिकाऱ्यांनी गाव चलो अभियान राबविले.नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी गेल्या दहा वर्षात केंद्र शासनाने राबविलेल्या सर्व योजनांची माहिती या अभियानात देण्यात आली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *