ओबीसी नेतृत्व की संधी साधू राजकारणी नेता
ओबीसी नेतृत्व की
संधी साधू राजकारणी नेता

गेली चाळीस वर्ष छगन भुजबळांच्या राजकारणाकडे पाहिले तर ते कसे संधी साधू आहेत,हे वेळो वेळी सिद्ध झाले आहे.
त्यांची सुरवाती पासूनची भूमिका आणि कारकिर्द ही वादग्रस्त दिसत आहे.शिवसेनेच्या सुरुवातीला आघाडीचे नेतृत्व म्हणून स्वर्गीय बाळसाहेब ठाकरे यांनी त्यांना सर्वंच स्थरावर संधी दिली.तरुण वयात दोन वेळा मुंबई महापालिकेचे महापौरपद,प्रथ मच आमदारकी ही दिली, बाळासाहेबांची
अत्यंत विश्वासू व्यक्ती अशी त्यांची प्रतिमा होती.म्हणुणच बाळासाहेबांचे विशेष प्रेम त्यांना लाभले हे खरे होते.
जेव्हा जेव्हा सत्तेचा सोपान चढायचा विषय आला,त्या त्या वेळी भुजबळांनाच झुकते माप दिले गेले
त्याचीच प्रचिती मुंबईचे प्रथम महापौर म्हणून त्यांच्या केलेल्या सन्मातून आलाच आहे.
शिवसेनेच्या पदार्पणातच संघटनेत त्यांच्या शब्दाला सोन्यासारखा भाव होता. एकेकाळचे अनभिषिक्त सम्राट म्हणून सन्मानाने बाळासाहेबांनी त्यांना वागवले,
परंतु अचानक यू टर्न घेत १४ आमदार घेऊन रात्रीतून पक्ष व निष्ठा बदलली.हे त्यावेळी कडव्या शिवसैनिकांना आणि बाळासाहेबांना अजिबात आवडलं नव्हतं.
सत्तेत येऊन गृहमंत्री म्हणून त्यांनी पितृतुल्य मानलेल्या बाळासाहेबांना अटकही केली.जे कधी स्व.इंदिरा गांधींनी सुद्धा केलं नाही.एव्हढे धाडस त्यांनी कोणाच्या जीवावर दाखवले.
कायमच सत्तेच्या राजकारणात सक्रिय राहण्यासाठी त्यांनी कायमस्वरूपी ओबीसीचे एकमेव तारणावर अशी आभासी प्रतिमा स्वतःहुन तयार केली.
वास्तविक ओबीसी समाजाची अशी वेगळी मानसिकता कधीच नव्हती.परंतु सत्तेच्या राजकारणाचा लाभ घेण्यासाठी त्यांनी मराठा समाजावर टोकाची टिका केली, त्याची आवश्यकता या पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकारणात कधीच नव्हती.,
कारण प्रत्यक्ष ओबीसी आणि इतर समाज अगदी एकोप्याने आणि गुण्यागोविंदाने वर्षोनुवर्षं नांदत आहेत.
परंतु वैयक्तिक स्वार्थापोटी त्यांनी समाजातील एकोपा बिघडवाला.त्याला खतपाणी घातले, ते करत असताना याचा दूरगामी काय परिणाम होईल याचा विचार कधी केला नाही तो त्यांनी आता तरी करावा.
अडीच वर्षा पूर्वी त्यांनी शरद पवारांना पण त्यांनी सत्तेच्या लालसेपोटी धक्का दिला, आणि
अचानक भेटायला जातो असे सांगून थेट टीव्हीवर शपथविधी मधे सामील झाले.हे त्यांनी स्वतःच कबूल केले होते.
वास्तविक शरद पवारांनी त्यांना कायमच मानाने सन्मान दिला तसेच त्यांच्या मागे खंबीरपणे उभेही राहिले.मानसिक आधारही दिला परंतु शरद पवारांचा पण त्यांनी विश्वासघात केला,शरद पवारांना विश्वासात न घेता बिहार सारख्या राज्यात ओबीसींचे मेळावे आयोजित केले,
परंतु त्या नंतर ही वेळोवेळी पक्षविरोधी भूमिका घेतली आणि तसं वक्तव्य करत राहिले, आणि अजूनही करत आहेत,
विधानसभा निवडणुकीत पण यूतीच्या विरोधी आणि आपल्याला सोयीस्कर भूमिका घेऊन स्वपक्षीय नेतृत्वाच्या भावनेकडे दुर्लक्ष केले.आपल्या पेक्षा कोणीच मोठा नाही, मी सांगतो तेच खरे, शेजारच्या नांदगाव विधानसभा मतदारसंघात डोकं घालुन पायांवर धोंडा पाडून घेतला, कांदे सारख्या बलाढ्य नेत्यांच्या समोर सवता सुभा मांडला. ही स्वार्थाची परिसीमा गाठली. सर्वांनाच याचा धक्का बसला, खुद्द मा.मुख्यमंत्री शिंदे यांना पण बसला.
वेळोवेळी स्वार्थाची भुमिका घेऊन सर्वांसमोर उघड पडले.
वास्तविक पंकज भुजबळ यांना विधान परिषदेत स्थान दिले आणि योग्य तो सन्मानही केला.
आपण. हे बघत आलो आहोत, आत्तापर्यंत गेले चाळीस वर्षे आपल्या सर्व कुटुंबीयांना सत्तेचा फायदा मिळाला.
आजपर्यंत त्यांच्या घरात आमदारकी, खासदारकी, मंत्री पद, उपमुख्यमंत्री महापौर, अशी सर्व पदे सहज मिळाली.
परंतु मा.भूजबळ साहेबांनी कायमस्वरूपी नाराजीचे नाटक करून,कधी अभिनय करून,कधी विरोधी वक्तव्य करून स्वतःचा आणि कुटुंबातील सर्वांचा फायदा करून घेण्यात यशस्वी झाले आहेत.
राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात,उद्योगात, साखर कारखाना, सर्वच क्षेत्रात त्यांनी प्रगती केली, त्याबद्दल कोणाचाही विरोध किंवा दुस्वास नाही.त्याबद्दल कोणाचीही तक्रार नाही व नसावी.
पण राजकीय फायद्यासाठी
ओबीसी समाजाची कायमच दिशाभूल करत.कायमच आभासी आणि टोकाची भुमिका घेऊन समाजाची फसवणूक केली.
समाजाला एकमेकांच्या समोर आनले हे राजकीय समीकरण कोणालाच आवडलेलं नाही.
वास्तविक ओबीसी आणि इतर समाज कायम एकोप्याने, एक दिलाने राहिले आहेत, मराठा,
ओबीसी,आणि इतरही समाज बांधव कायमच एकमेकांचे भाऊबंद जसे राहतात तसे राहिले आहेत, एकमेकांच्या मदती साठी धावले.सुख दुःखात सामील झाले, परंतु गेल्या काही वर्षात समाजात फूट पडत आहे आणि एकमेकांना वेगळं समजायला लागले हे बरोबर नाही, ही दूरी वेळीच थांबावी ही सर्व सामान्य जनतेची ईच्छा आहे. वास्तविक पाहता भुजबळ साहेबाचे वय बघता सत्तेच्या राजकारणा पासून दूर राहून केवळ शेतकरी हितासाठी, निकोप सामाजिक सलोख्यासाठी काम करणं अपेक्षित असताना ते आकांडतांडव करून समाजाला वेठीस धरणे संयुक्तिक नाही.
आपल्या घरातील व्यक्ती व्यतिरिक्त कोणीतरी नवीन नेतृत्व निर्माण करणं अपेक्षित आहे.त्यातच त्यांच्या कार्याची सार्थक सांगता झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
आणि त्यांनी आपण स्वतः हुन ज्येष्ठांची भुमिका घेण यातच त्यांचा मोठेपणा दिसेल..योग्य ती समजूतदार भुमिका अपेक्षित आहे.
-कुबेर जाधव,
समन्वयक,स्वाभिमानी शेतकरी संघटना



