स्वाभिमान की स्वार्थ? उत्तर येणाऱ्या काळात ओबीसी समाजच देईल- करण गायकर
स्वाभिमान की स्वार्थ? उत्तर येणाऱ्या काळात ओबीसी समाजच देईल- करण गायकर
नाशिक प्रतिनिधी
छगन भुजबळ यांनी ‘स्वतःच्या मंत्रीपदासाठी रस्त्यावर उतरेन’ असे विधान करून स्वतःच्या राजकीय इच्छाशक्तीचे दर्शन घडवले आहे.स्वातंत्र्यानंतरच्या काळातील हे पहिलेच उदाहरण आहे, जिथे एखाद्या नेत्याने मंत्रीपदासाठी थेट आंदोलनाची धमकी दिली आहे.
भुजबळ ओबीसी अस्मितेचे प्रतीक म्हणून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत,मात्र यामागे अस्मिता नाही तर वैयक्तिक स्वार्थ असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक करण गायकर यांनी केला आहे.छगन भुजबळ राजकीय कारकिर्दीकडे पाहिले तर स्वतः,स्वतःचा मुलगा आणि पुतण्या या कुटुंबीयांपुरतेच त्यांचे राजकीय विश्व आहे.ओबीसी समाजाचा विकास किंवा राजकीय सबलीकरण हे त्यांच्या प्राधान्यक्रमात कधीच दिसून आलेले नाही.
भुजबळ यांचा माळी समाज हा ओबीसी वर्गातील एक महत्त्वाचा घटक आहे.मात्र,त्यांनी आजपर्यंत या समाजातील कोणत्याही तरुणाला राजकीय नेतृत्व देऊन मोठे केले नाही.गरीब आणि वंचित माळी समाजाच्या हितासाठी त्यांचा अजेंडाच दिसत नाही. मग ओबीसी अस्मितेची भाषा त्यांनी का करावी? आमदार पंकज भुजबळ यांच्या जागी त्यांच्यासाठी आत्तापर्यंत जिवाचे रान करणारे दिलीप खैरे यांना का आमदार केले नाही किंवा महाराष्ट्रातील अन्य त्यांच्यासाठी आयुष्यभर साथ देणाऱ्या एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला विधान परिषदेवर ते पाठवू शकत होते परंतु त्यांनी ते केले नाही त्यांनी त्यांच्या मुलालाच त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली यातून ते त्यांच्या कुटुंबीयांचा विचार करतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
राहिला प्रश्न सध्याच्या सरकारमध्ये ओबीसी समाजावर अन्याय झाला जी मंडळी गरज आहे त्यांनी महायुती सरकारमध्ये 19 OBC मंत्री
भाजप नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये एकूण 19 ओबीसी समाजाचे मंत्री आहेत,जे संपूर्ण मंत्रिमंडळाच्या जवळपास 50% आहेत.तरीही,भुजबळ यांना मंत्रीपद मिळाले नाही,याचा राग त्यांच्या वक्तव्यांतून स्पष्ट दिसतो.भुजबळ यांच्या मते,त्यांचा मंत्रिमंडळात समावेश न होणे म्हणजे ओबीसी समाजावर अन्याय आहे.मात्र,हा मुद्दा वैयक्तिक स्वार्थाचा आहे की संपूर्ण समाजाच्या प्रतिनिधित्वाचा,यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते.
भुजबळ यांचे वक्तव्य हे केवळ त्यांच्या व्यक्तिगत राजकीय स्वार्थासाठी असून ओबीसी समाजाच्या व्यापक हिताशी त्याचा काही संबंध नाही.याआधी त्यांनी स्वतःच्या मंत्रीपदासाठी ओबीसी अस्मितेचा मुद्दा पुढे करून समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत कधीच ओबीसी समाजाच्या सर्वसमावेशक विकासासाठी काम केले नाही. केवळ स्वतःचा आणि आपल्या कुटुंबीयांचा राजकीय फायदा साधला आहे.त्यामुळे,त्यांच्या ‘स्वतःच्या मंत्रीपदासाठी’ केलेल्या गप्पा हे वैयक्तिक स्वार्थाचेच प्रतीक आहे,असे मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक करण गायकर यांनी सांगितले
ओबीसी समाजाला सुद्धा विनंती आहे आत्ता जे काही ज्येष्ठ नेते छगन भुजबळ करत आहे जी काही घडामोड सध्या त्यांच्या माध्यमातून घडत आहे ही फक्त आणि फक्त समीर भुजबळ यांना राज्यसभेवर घ्यावे यासाठी आहे. त्यांना स्वतःला मंत्रिपद मिळत नसेल तर त्या बदल्यात समीर भुजबळ यांना राज्यसभेवर घ्यावे यासाठी हा सगळा प्रयत्न चालू आहे म्हणून ओबीसी समाजाने सुद्धा यांच्या सगळे प्रयत्न लक्षात घेता यांच्या पाठीशी उभे न राहता अनेक ओबीसी नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेले आहे त्यांच्या माध्यमातून ओबीसी घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा.