क्राईम

“नावा”च्या अध्यक्षपदी अमोल कुलकर्णी तर सरचिटणीसपदी दिलीप निकम


“नावा”च्या अध्यक्षपदी अमोल कुलकर्णी तर सरचिटणीसपदी दिलीप निकम

नाशिक- प्रतिनिधी

येथील जाहिरात संस्थांची संघटना नाशिक ऍडव्हर्टायझिंग एजन्सीज वेल्फेअर असोसिएशन (नावा ) च्या नूतन कार्यकारिणिची निवड करण्यात आली असून, अध्यक्षपदी अमोल ऍडव्हर्टायझिंगचे संचालक अमोल कुलकर्णी यांची तर सरचिटणीसपदी वत्सदा ऍडव्हर्टायझिंगचे संचालक दिलीप निकम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा हॉटेल करी लिव्हज भवन येथे संपन्न झाली. मागील कार्यकारिणीचा कार्यकाळ संपल्याने नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ऍड. भाऊसाहेब गंभीरे यांनी काम पाहिले. यावेळी नावाचे संस्थापक अध्यक्ष मोतीराम पिंगळे, मावळते अध्यक्ष प्रवीण चांडक, फेमचे अध्यक्ष रवी पवार यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

Advertisement

अध्यक्षपदासाठी अमोल कुलकर्णी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यावर कोणीही विरोध न दर्शवता कुलकर्णी यांच्या निवडीला एकमताने संमती देण्यात आल्याने त्यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले. सरचिटणीस पदासाठी दिलीप निकम यांचीही निवड बिनविरोध करण्यात आली.

उर्वरित कार्यकारिणी पुढील प्रमाणे- उपाध्यक्ष सुनील महामुनी व साहिल न्याहारकर, चिटणीस नितीन शेवाळे, खजिनदार राजेश शेळके, कार्याध्यक्ष गणेश नाफडे, जनसंपर्क संचालक श्याम पवार, सल्लागार संचालक डॉ. अभिजीत चांदे तर कार्यकारणी सदस्य- दिनेश गांधी, शैलेश दगडे, किशोर खैरनार यांचा समावेश करण्यात आला. यावेळी विठ्ठल राजोळे, प्रविण चांडक, दीपक जगताप, पराग गांधी, योगेश पगारे, सुभाष लगली, तन्मय जोशी, महेश कलंत्री, प्रताप पवार, श्रीकांत नागरे, धनंजय मोहाडकर, किरण पाटील, मिलिंद महाजन, प्रवीण मराठे, सतीश बोरा, विठ्ठल देशपांडे, कैलास खैरे, अनिल अग्निहोत्री आदी सदस्य उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *