राष्ट्रवादीच्या सुनीता चारोस्कर यांचा दिंडोरीतून उमेदवारी अर्ज दाखल
राष्ट्रवादीच्या सुनीता चारोस्कर यांचा दिंडोरीतून उमेदवारी अर्ज दाखल
वणी प्रतिनिधी
दिंडोरी विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून सुनिता चारोस्कर अर्ज दाखल केला.
यावेळी अर्ज दाखल करतांना दिंडोरी तालुक्यातील कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, खा. भास्कर भगरे गोकुळ पिंगळे,गणपत पाटील,बाजार समितीचे चेअरमन प्रशांत कड, रामदास चारोस्कर, बंटी बागमार यांच्यासह महाविकास आघाडीतील मित्र पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते..
त्यानंतर जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले.नंतर संस्कृती लॉन्स येथे जाहीर सभा झाली. सर्व मान्यवरांनी मार्गदर्शनातून पुढील प्रचारास सुरुवात करण्यात आली.