क्राईम

झिरवाळ यांच्यासाठी शरद पवारांची खेळी  दिंडोरी लोकसभा मतदार संघातून यांना मिळणार संधी


झिरवाळ यांच्यासाठी शरद पवारांची खेळी

 दिंडोरी लोकसभा मतदार संघातून यांना मिळणार संधी
दुनियादारी /नाशिक
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर यंदा होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कुणाची सरशी होणार? काका सरस ठरणार की पुतण्या मात देणार याविषयी भल्या भल्या राजकीय जाणकारांना भविष्य वर्तवणे अवघड झाले आहे. सत्ता आणि विद्यमान आमदार सोबत असल्याने अजित पवार यांना  येणाऱ्या निवडणुका सहज जिंकणे शक्य होईल अशा अटकळी बांधल्या जात असल्याने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कडून उमेदवारी मिळाली तर निवडून येणे सोपे होईल या आशेने विद्यमान आमदार दिल्लीला जाण्याचे स्वप्न पाहू लागले आहेत. त्यातच दिंडोरी मतदार संघातून विद्यमान आमदार आणि विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे देखील लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याची चर्चा असतांना इकडे ही जागा जिंकण्यासाठी शरद पवार यांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
या रण नितीचाच एक भाग म्हणून शरद पवार यांनी मुंबईत नुकतीच एक बैठक बोलावली होती. या बैठकीत   दिंडोरी लोकसभा मतदारसंघात कुणाला उमेदवारी देता येऊ शकते यावर बरेच मंथन झाल्याचे समजते.
स्वतः शरद पवार यांनी ही बैठक संचलित केल्याने या बैठकीत चर्चेतून निघालेला निष्कर्ष शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला विजया पर्यंत पोहचविण्याचे संकेत देत आहे. विद्यमान खासदार मंत्री आणि कळवण सुरगाण्याचे आमदार असलेल्या पवार कुटुंबातील   मतभेद देखील शरद पवार यांच्या पथ्यावर पडणार  असल्याची चर्चा आहे.शरद पवार यांनी बोलवलेल्या या बैठकीत  प्रामुख्याने चिंतामण जानू गावित सुरगाणा व भास्कर भगरे दिंडोरी या दोन नावांवर  चर्चा झाली.येत्या आठ दिवसात दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार निश्चित होईल. अशी शक्यता वर्तवली जात असून कोरी पाटी म्हणून या नावांवर शरद पवार स्वतः आग्रही असल्याचे बोलले जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *