निकालानंतर सिन्नरमध्ये शिवसैनिकांचा जल्लोष तालुका प्रमुख शरद शिंदे यांनी केले ११ किलो लाडु वाटप
निकालानंतर सिन्नरमध्ये शिवसैनिकांचा जल्लोष
तालुका प्रमुख शरद शिंदे यांनी केले ११ किलो लाडु वाटप
सिन्नर प्रतिनिधी
Advertisement
अखेर सत्याचा विजय झाला. भगवान के घर देर है अंधेर नाही, सत्य परेशान है पराजित नाही अशा भावना व्यक्त करीत सिन्नरच्या शिवसैनिकांनी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालानंतर जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला. विधिमंडळात अनेक दिवासा पासून प्रलंबित आणि बहुचर्चित असलेला आमदार अपात्रते बाबतचा निकाल लागल्या नंतर सिन्नर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कडवे समर्थक शरद शिंदे यांनी मिठाई वाटून जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला. शिवसेना ही आदरणीय बाळासाहेब ठाकरे व रक्त आटवणाऱ्या शिवसैनिकांची आहे. भारतात लोकशाही आहे, हुकुमशाही नाही. पक्ष,सरकार, मुख्यमंत्री, आमदार, खासदार ते सरपंच ही पद लोकशाही मार्गाने जनतेची आहेत. ती काही वडिलोपार्जित इस्टेट नव्हे. बापानंतर मुलाची,नंतर नातवाची असे नसून घराणेशाहीला, हुकूमशाहीला चपराक देत विधानसभा अध्यक्ष राहुल नॉर्वेकर यांनी खऱ्या शिवसैनिकांना न्याय दिला. अशी भावना निकाल लागल्या नंतर सामाजिक कार्यकर्ते शिवसैनिक शरद शिंदे यांनी व्यक्त केली. अखेर ४०वर्षे रक्ताच पाणी करणाऱ्या एकनाथ शिंदे व ४०आमदार व शिवसैनिकांची शिवसेना असा न्याय दिला गेला. सर्वसामान्य शिवसैनिकांच्या विजयाबद्दल सिन्नर येथे शिवसेना पक्षाने तालुकाप्रमुख शरद शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ११ किलो लाडू वाटप करत आनंद साजरा करण्यात आला.
यावेळी उपाध्यक्ष जालिंदर लोंढे, गोपाळ गायकर उपाध्यक्ष, गटप्रमुख शिवाजी गुंजाळ, शहराध्यक्ष संदिप लोंढे, संघटक भास्कर उगले, मार्गदर्शक रामबाबा शिंदे, महिला आघाडीच्या गायकवाड ताई, चिंधु गुंजाळ,देशमुख दादा ,गणप्रमुख सुरेश सानप, लाड दादा, हेमंत काकडसह शेकडो शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.