खाजगी कसमादे शेतकरी कृषी उत्पन्न बाजार ढोलबारे येथे मक्याची व सर्व प्रकारातील भुसार धान्याची खरेदी शुभारंभ; 👉 मका व इतर भुसार मालाची उच्च प्रतीची खरेदी; 👉 शेतीमालाच्या गुणवत्तेनुसार योग्य व न्याय्य किंमत दिली जाणार
खाजगी कसमादे शेतकरी कृषी उत्पन्न बाजार ढोलबारे येथे मक्याची व सर्व प्रकारातील भुसार धान्याची खरेदी शुभारंभ;
👉 मका व इतर भुसार मालाची उच्च प्रतीची खरेदी;
👉 शेतीमालाच्या गुणवत्तेनुसार योग्य व न्याय्य किंमत दिली जाणार
ढोलबारे, ता. बागलाण प्रतिनिधी
खाजगी कसमादे शेतकरी कृषी उत्पन्न बाजार, ढोलबारे येथे मका व इतर भुसार धान्याची खरेदी सुरू करण्यात आली. या महत्त्वपूर्ण खरेदी शुभारंभाचे उद्घाटन छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
या सोहळ्याला जन स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश नाना पवार, छावा क्रांतिवीर सेनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष विजय अण्णा वाहुळे,तसेच आयटी विभाग राज्य संपर्कप्रमुख वैभव दळवी प्रमुख उपस्थित होते.या कार्यक्रमात शेतकरी आणि व्यापारी वर्गाने मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
खाजगी कसमादे शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीची वैशिष्ट्ये:
👉 मका व इतर भुसार मालाची उच्च प्रतीची खरेदी
👉 शेतीमालाच्या गुणवत्तेनुसार योग्य व न्याय्य किंमत दिली जाणार
👉 नामांकित व्यापारी वर्ग व सेवाभावी कर्मचारी वर्ग
👉 सुशोभित मार्केट परिसर आणि अद्यावत सोयीसुविधा
👉 शेतकरी व व्यापारी विश्रांती निवासस्थान उपलब्ध
करण गायकर यांनी आपल्या मार्गदर्शनात शेतकरी आणि व्यापाऱ्यांना एकमेकांना समजून घेत व्यापार करण्याचे महत्त्व सांगितले.शेतकऱ्यांनी खूप मेहनत घेऊन उभारलेल्या पिकांचा उचित मोबदला मिळावा,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.शेतकऱ्यांचा विकास झाला तर व्यापारी व्यवस्थाही सक्षम होईल,असेही त्यांनी नमूद केले.खाजगी कसमादे शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील सुसंवाद साधण्यासाठी तत्पर असून, यामुळे दोघांच्याही हिताचे परिणाम साधले जातील.असे ते म्हणाले.
सुरेश नाना पवार यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांना विनंती केली की त्यांनी भीती न बाळगता बाजारात येऊन आपला माल विकावा.शेतमालाच्या गुणवत्तेनुसार शेतकऱ्यांना उचित दर मिळावा,यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.नामांकित व्यापाऱ्यांना बाजारात आणून शेतकऱ्यांच्या मालाचा योग्य मोबदला मिळविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
विजय वाहुळे यांनी सांगितले की, व्यापारी,हमाल आणि कर्मचारी यांनी शेतकऱ्यांचे हित जोपासले तर येणाऱ्या काळात हे मार्केट प्रचंड यशस्वी होईल. या मार्केटच्या माध्यमातून अनेक बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळतील,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या कार्यक्रमात मोठ्या संख्येने शेतकरी व व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.