क्राईम

जिजाऊंच्या लेकींचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना साकडे ; सगे सोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी दिले निवेदन 


जिजाऊंच्या लेकींचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना साकडे

 

सगे सोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी दिले निवेदन 

नाशिक /आपली दुनियादारी

मराठा आरक्षण सगे सोयरे अध्यादेशाची अमंलबजावणी त्वरित करावी यासाठी राजमाता जिजाऊ प्रतिष्ठाणच्या वतीने जिजाऊच्या लेकींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे.

मेळा बस स्थानकासह नाशिक शहरातील विविध विकास कामांचे लोकार्पणासाठी दौऱ्यावर आलेले

Advertisement

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ठक्कर बाजार मेळा बस स्थानक येथील सभा आटोपून परत जात असतांना राजमाता जिजाऊ प्रतिष्ठाणच्या संस्थापक अध्यक्ष माधवी पाटील,रोहिणी उखाडे,अनिता गारूळे,स्वाती कदम,एकता खैरे,ममता शिंदे या जिजाऊच्या लेकींनी त्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. मराठा संघर्ष योध्दा मनोजदादा जरांगे-पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून पुन्हा आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांच्या प्रकृतीची काळजी संपूर्ण मराठा समाजाला आहे, म्हणून महाराष्ट्र शासनाने २७/१/२०२४ रोजी मराठा सगे -सोयरे आरक्षणाचा अध्यादेश काढला असून या अध्यादेशाची त्वरित अंमलबजावणी करून मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.या निवेदनावर फडणवीस यांनी या अध्यादेशाबाबत सरकार सकारात्मक असल्याची प्रतिक्रिया दिली.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *