चार दिवसांपासून रेल्वेच्या पाईप लाईनला गळती अधिकारी कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष,नागरिक हवालदिल
चार दिवसांपासून रेल्वेच्या पाईप लाईनला गळती
अधिकारी कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष,नागरिक हवालदिल
गणेश केदारे / मनमाड
मनमाड शहरातील सिद्धिविनायक नगर भागात रेल्वे लगत असलेल्या रेल्वेला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईनला मागील चार दिवसापासून गळती लागल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांना सांगूनही यावर कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याने कुठलाच पर्याय निघत नाही. अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून स्थानिक नागरिकांना उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत. या त्रासातून स्थानिक नागरिकांना कधी मुक्त करणार असा सवाल उपस्थित केला जातोय.वातावरणीय बदलामुळे डेंगू, मलेरिया, ताप, सर्दी, खोकला यासारख्या साथीच्या आजारांनी नागरिक त्रस्त असताना रेल्वे प्रशासनाच्या या अक्षम्य हलगर्जीपणामुळे घरचं झालं थोडं व्याह्याने धाडलं घोडं अशी मनमाडकरांची अवस्था झालीये. रेल्वे प्रशासनाने यावर त्वरित तोडगा काढून स्थानिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागलीये.