जय बाबाजी भक्त परिवाराने केले नाशिकच्या समस्यांचे दहन !
जय बाबाजी भक्त परिवाराने केले नाशिकच्या समस्यांचे दहन !
नाशिक : प्रतिनिधी
निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराजांचे उत्तराधिकारी,नाशिक लोकसभेचे उमेदवार अनंत विभूषित महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने होळी उत्सवाचे आयोजन करण्यात आले.यावेळी होळी मध्ये नाशिकच्या समस्यांचे दहन करण्यात आले.
ओझर येथील देवभूमी जनशांती धाम येथे होळी उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमा प्रसंगी होळी मध्ये नाशिक मधील सर्व समस्यांचे दहन करण्यात आले.यावेळी भाविकांच्या उपस्थितीत शांतिगिरीजी महाराजांनी होळीचे पूजन करून नाशिककरांना होळीच्या शुभेच्छा दिल्या, नाशिक जिल्ह्यात वाढलेली गुन्हेगारी, देशात वाढलेली प्रचंड महागाई व बेरोजगारी,विविध क्षेत्रातील अडचणी, नाशिकची ट्राफिक समस्या व शेतकऱ्यांच्या समस्या,चुकीच्या धोरणाचे तसेच व्यसनांचे दहन करण्यात आले, बॅनर फडकावून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी भ्रष्टाचार मुक्त भारत करण्यासाठी राजकारणात स्वच्छ प्रतिमेचे प्रतिनिधी निवडून देण्याचे आवाहन महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी उपस्थितीत नागरिकांना केले.राजकारणाचे शुध्दीकरण आजच्या काळाची गरज आहे.राजकारण करणे चांगल्याच माणसांचे काम आहे असे येथे ठासून सांगण्यात आले.यावेळी उपस्थित नागरिकांनी ‘नाशिक का खासदार कैसा हो, शांतिगिरी जी महाराज जैसा हो, शांतिगिरी महाराजांचा विजय असो अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. असत्यावर सत्याचा विजय म्हणून होळीचा हा उत्सव साजरा करण्यात येतो त्यामुळं येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आसत्याला दूर करून सत्याचा दणदणीत विजयी करा असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

यावेळी नागरिकांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध करून नाशिक का खासदार कैसा हो शांतिगिरी महाराज जैसा हो, शांतिगिरी महाराजांचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

जय बाबाजी भक्त परिवाराने केले नाशिकच्या समस्यांचे दहन !

