नंदुरबारला दंगलीमुळे तणाव; अश्रुधुरासह पोलीस बळाचा वापर;पी आर पाटील यांची आठवण
नंदुरबारला दंगलीमुळे तणाव; अश्रुधुरासह पोलीस बळाचा वापर
नंदुरबार -प्रतिनिधी
येथे ईद-ए-मिलादच्या मिरवणुकी दरम्यान अचानक दोन गटात वाद झाल्यानंतर त्याचे पर्याय तुफान दगडफेकीत झाले. दगडफेक करणाऱ्यांनी पोलिसांना आणि पोलीस वाहनांना लक्ष बनवल्यामुळे परिस्थिती अधिकची चिघळली. परिणामी अनावर झालेला जमाव नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला.
दुपारी तीन वाजेच्या दरम्यान हा सर्व प्रकार उद्भवला. ईद-ए-मिलाद मिरवणुकीनिमित्त हजारो जणांचा जमाव नंदुरबार शहरातील रस्त्यावर उतरलेला होता. त्याचवेळी धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे घडलेली दगडफेक आणि निर्माण झालेला तणाव लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक एस श्रवण दत्त यांनी नंदुरबार शहरात बंदोबस्त तैनात केलेला होता. तरीही वाद घडला आणि अचानक जोरदार दगडफेक सुरू झाली. वाद नेमका काय झाला ते स्पष्ट झालेले नाही तथापि दगडफेक करणाऱ्या जमावाने प्रथम पोलिसांना आणि पोलीस वाहनांना लक्ष बनवले. त्यामुळे पोलिसांच्या अनेक वाहनांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. काही पोलीस जखमी झाल्याचे सांगण्यात आले. शहरातील प्रमुख बाजारपेठ देखील लक्ष बनवण्यात आल्यामुळे अवघ्या काही मिनिटात संपूर्ण शहर बंद पडले.
पी आर पाटलांची झाली आठवण !
नंदुरबार जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक पी आर पाटील,यांनी नंदुरबार जिल्ह्यात चांगले नियोजन करत अनेक महिने अवैध बेकायदेशीर मंडळींच्या कुरापतींना पायबंद घातला होता. पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी समजून तात्काळ मार्गी लागत होत्या. एकूणच जिल्हा पोलिस दलात त्यांचे काम दखलपात्र ठरले होते. म्हणूनच नंदुरबार जिल्ह्या त्यांना कायम लक्षात ठेवेल.
दक्षता म्हणून शाळा बंद करून विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले. माळीवाडा सोनार खुंट तेली गल्ली काळी मशीद परिसर अशा प्रमुख ठिकाणी काही दुकानांचे व काही घरांचे नुकसान झाल्याची तसेच जमावाला नियंत्रित करण्यासाठी अश्रुदुराच्या नळकांड्या चा वापर पोलिसांना करावा लागल्याची प्राथमिक माहिती आहे परंतु याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. अद्याप तणाव कायम असून पोलीस दल नियंत्रण मिळवून शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात आहे. पाच वाजे नंतर स्थिती नियंत्रित येत असल्याचे निदर्शनास आले.