ठाणगाव पंचक्रोशीतील भाजपला सापडला परिस! आजी माजी सरपंचांसह दीडशे कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश
ठाणगाव पंचक्रोशीतील भाजपला सापडला परिस!
आजी माजी सरपंचांसह दीडशे कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश
रश्मी मारवाडी आपली दुनियादारी
शत प्रतिशत भाजपा या मोहिमेला सिन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात उदंड प्रतिसाद मिळत असून भाजपा कार्यकर्ते आणि नव्याने भाजपात येऊ पाहणारे इच्छुक त्याचे सारे श्रेय ठाणगावचे भूमिपुत्र मुकुंद काकड आणि रामदास भोर यांनाच देतात याच मोहिमे अंतर्गत ठाणगाव येथे मोठ्या संख्येने माजी आजी सरपंचांसह अन्य पक्षातील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने पंचक्रोशीत पक्षाची ताकद वाढली आहे.या आनंदाच्या प्रसंगी नव्या जुन्या भाजपेयिंच्या वतीने गावात प्रभू रामाची मंदिरामध्ये पूजन व आरती व मंदिराची स्वच्छता करण्यात आली.भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष, सुनील बच्छाव भारतीय जनता पार्टीचे प्रभारी सिन्नर जयंतराव आव्हाड, भटके विमुक्त आघाडी भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष, मुकुंद काकड, भारतीय जनता पार्टी संयोजक नाशिक आदित्य केळकर, सरचिटणीस नाशिक ज्ञानेश्वर कुराडे,भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष बहिरू दळवी, भारतीय जनता पार्टी सरचिटणीस रामदास भोर, भारतीय जनता पार्टी जिल्हा युवा उपाध्यक्ष यज्ञेश काळे, युवा तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे, ओबीसी तालुका अध्यक्ष मोहना आव्हाड ,यांच्या उपस्थितीत 150 कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. ठाणगाव गोपीनाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र काकड, आशापुरचे माजी सरपंच ज्येष्ठ नेते बबन दादा काकड, विष्णुपंत पाटोळे ,भाऊसाहेब काकड, अशोक काकड बाळासाहेब काकड, मोहन शिंदे, किसन शिंदे, कैलास काकड ,गौतम काकड किसन दौड ,वसंत आव्हाड ,वसंत काकड, नामदेव काकड, विजय काकड, भास्कर आंधळे ,सुखदेव आंधळे, शिवाजी काकड विनोद शिंदे,,यावेळी जिल्हाध्यक्ष श्री सुनील बच्छाव यांनी आपले मनोगत व्यक्त केले, भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या देशाला प्रगतीपथावो नेण्याचे काम केलेले आहे व 22 आयत्या नगरीमध्ये प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा सोहळा त्यानिमित्ताने आपल्या गावामध्ये सर्व मंदिरांमध्ये पूजा पाठव मारुती भजन कीर्तन महाप्रसाद दिवाळी साजरी करावी व सिन्नर तालुक्याचे प्रभारी जयंतराव आव्हाड यांनी आपले मनोगत व्यक्त केली देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या ग्रामीण भागासाठी अनेक योजना राबवत आहे तरी सर्व ग्रामीण भागातील लोकांनी त्याचा लाभ घ्यावी व भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेल्या कार्यकर्त्यांना जोमानी नवीन ऊर्जांनी काम करावी, यावेळी उपस्थितीत जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, सिन्नर तालुका प्रभारी जयंतराव आव्हाड, भटकी विमुक्त आघाडी महाराष्ट्र उपाध्यक्ष मुकुंद काकड, आदित्य केळकर, रामदास भोर, उपसरपंच विलास मोरे ,यज्ञेश काळे प्रमोद शिंदे समाधान केकान, मोहन आव्हाड, संजू शेठ शिंदे, विनोद आंबेकर हरिभाऊ काकड, आशापुरचे सरपंच दीपक पाटोळे, कचरू नाना पाटोळे, हिवरे माजी सरपंच केशव सहणे, सूर्यभान पाटोळे, शुभम केदार ,सलमान मनियार, विजय काकड, विनोद शिंदे ज्ञानेश्वर शिंदे, कार्यक्रमासाठी परिश्रम यज्ञेश काळे प्रमोद शिंदे, रामदास भोर यांनी घेतली, प्रमोद शिंदे, आभार व्यक्त केले. यावेळी संख्येने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हजर होते.
…. लक्ष मात्र पिलापाशी:
घार उडे आकाशी, लक्ष मात्र पिलापाशी… मातृस्नेह दर्शवणारी ही भावना नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर असलेल्या सिन्नर तालुक्यातील अनेक भूमिपुत्रांना लागू पडते. मुकुंद काकड हे त्यापैकीच एक. आपल्या बांधकाम व्यवसायानिमित्त मुकुंद काकड हे मुंबईत स्थायिक असले तरी मानसिक दृष्ट्या ते प्रत्येक क्षणी सिन्नर तालुक्यातच वावरत असतात. व्यवसायाचा प्रचंड व्याप सांभाळून देखील आठवडा नाहीच जमलं तर महिन्यातून एकदा तरी सिन्नरला येऊन विविध प्रकारच्या समस्या जाणून घेत त्यांचे निराकारण करण्यासाठी ते प्रयत्नशील असतात.एखादी समस्या घेऊन कुणी सिन्नरकर मुंबईला गेले तर त्याचे समाधान होई पर्यंत पाठपुरावा करणारे मुकुंद काकड म्हणूनच सिन्नर तालुक्यात लोकप्रिय आहेत. या लोकप्रियतेचा फायदा सिन्नर तालुका भाजपाला होत असून जयंत आव्हाड, रामदास भोर यांच्या सहकार्याने तालुक्यात पक्ष वाढावा म्हणून मुकुंद काकड सतत प्रयत्नशील दिसतात. त्याची पावती म्हणून पक्षाने नजिकच्या भविष्य काळात मुकुंद काकड यांच्या खांद्यावर एखादी मोठी जबाबदारी सोपवली तर अजिबात आश्चर्य नाही.

