क्राईम

मुरबाडमध्ये १० हजार कला, क्रीडा खेळाडूंसह भव्य कला-क्रीडा महोत्सव रंगणार ! जनसेवा प्रतिष्ठानतर्फे सुभाष पवार यांच्याकडून आयोजन


मुरबाडमध्ये १० हजार कला, क्रीडा खेळाडूंसह

भव्य कला-क्रीडा महोत्सव रंगणार !

जनसेवा प्रतिष्ठानतर्फे सुभाष पवार यांच्याकडून आयोजन

 

☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️

मराठी संस्कृती जतन करा 

……………………………………………………………………………

 

बाळासाहेब भालेराव मुरबाड

मुरबाड तालुक्यातील विविध क्षेत्रातील कलाकारांबरोबरच होतकरू खेळाडूंना व्यासपीठ निर्माण करण्यासाठी जनसेवा प्रतिष्ठान व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्याकडून मुरबाड तालुक्यात भव्य कला-क्रीडा महोत्सव भरविण्यात येत आहे.

गुरुवारी २६ डिसेंबर२०२४ महोत्सवाला सुरूवात होत असून, तालुक्यातील १० हजार कला , क्रीडा खेळाडूसह विविध सांस्कृतिक कलाकार-खेळाडूंचा सहभाग राहील, अशी माहिती जनसेवा प्रतिष्ठानतर्फे देण्यात आली आहे.

तर सकाळी नऊ वाजता क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन शिवले महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे .तर संध्याकाळी चार वाजता खुले नाट्यगृह येथे मुख्य कला महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे तरी सर्व क्रीडा खेळाडू तसेच क्रीडा प्रेमी तसेच सर्व नागरिकांनी महोत्सवात उपस्थित राहण्याचे आवाहन जनसेवा प्रतिष्ठान मुरबाडच्या वतीने करण्यात आले आहे.

Advertisement

लोकनेते व माजी आमदार, जनसेवा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गोटीरामभाऊ पवार यांच्या मार्गर्शनाखाली कला-क्रीडा महोत्सवाला सुरूवात होणार आहे. त्यातून अनेक खेळाडू व कलाकारांचा उदय झाला. काही खेळाडूंनी चमकदार कामगिरी बजावून मुरबाड तालुक्याचे नाव उंचावले आहे.

जनसेवा प्रतिष्ठानने महोत्सवाची परंपरा कायम ठेवली असून, यंदा २६ डिसेंबर ते २८ डिसेंबर पर्यंत भव्य क्रीडा महोत्सव व लोकनृत्य यांच्यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या क्रीडा महोत्सवात लोकनृत्य स्पर्धा, भजन स्पर्धा, तीन गटांमध्ये भावगीत गायन, दोन गटांमध्ये रांगोळी, दोन गटांमध्ये लावणी नृत्य होईल. या स्पर्धामधील विजेत्यांनाही रोख रक्कमेची बक्षीसे दिली जातील. मुरबाड बाजारपेठेतील खुला रंगमंच येथे कला विभागाच्या स्पर्धा, तर शिवळे महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर क्रीडा स्पर्धा होतील. या स्पर्धेच्या नोंदणीला खेळाडू व कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, आतापर्यंत हजोरा जणांनी नावनोंदणी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *