अविनाश शिंदेंच्या विजयासाठी महिला सक्रीय; भाऊबीजेचे औचित्य साधत शेकडो भगिनींनी केले औक्षण
अविनाश शिंदेंच्या विजयासाठी महिला सक्रीय;
भाऊबीजेचे औचित्य साधत शेकडो भगिनींनी केले औक्षण

नाशिक- प्रतिनिधी
देवळाली विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे धडाडीचे उमेदवार अविनाश शिंदे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली असून, सर्व थरातून त्यांना भरीव पाठिंबा मिळत आहे.भाऊबीजेचे औचित्य साधून शेकडो महिलांनी शिंदे यांचे औक्षण करून त्यांना निवडून आणण्याचा संकल्प केला.तुमचा विजय हीच आमच्यादृष्टीने ओवाळणी ठरेल,असे या बहिणींनी सांगितले.त्यावेळी तेथील वातावरण अत्यंत भावनिक झाले होते. अनेकांनी अश्रूंना वाटही मोकळी करून दिली.विशेष म्हणजे या महिलांनी या भावाला निवडणूक लढविण्यासाठी आपापल्यापरीने आर्थिक मदतही केली.

“या आहेत कुंभार समाजातील ताई, त्यांनी आपले स्त्री धन अविनाश शिंदे यांना सुपूर्द करून त्यांना विजयासाठी आशीर्वाद दिलेत. खरे तर भाऊबीज हा भाऊ बहिणीतील नात्याचे अतूट बंधन जपणारा पवित्र उत्सव. बहिणीने भावाला औक्षण करून भावाने बहिणीला ओवाळणी द्यायची. ही खरी प्रथा… इथे मात्र वेगळेच चित्र दिसले. अविनाश शिंदे या भावाला बहिणींनी औक्षण तर केलंच. उलट स्वतःकडे असलेले किडूक माडूक देखील अविनाश शिंदे यांच्या पदरात टाकून विजयासाठी आशीर्वाद दिले. हे असते लोकांनी निवडणूक हातात घेणे.”

“या गुरुजींनीही अविनाश शिंदे यांना गळ्यातील चेन काढून निवडणूक लढविण्यासाठी सदिच्छा दिल्यात. मतदार संघात उमेदवाराला असे निखळ प्रेम मिळणे हे अलीकडच्या काळातील दुर्मिळ घटना. हे भाग्य अविनाश शिंदे यांना लाभले. जनशक्ती विरुद्ध धनशक्ती यातील नेमका फरक हा मतदार संघ अविनाश शिंदे यांच्या माध्यमातून अनुभवत आहे.”
अविनाश शिंदे यांना पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर त्यांच्या विजयासाठी कार्यकर्ते जीवाचे रान करीत आहेत. त्यात महिलांनी मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली आहे. जमिनीवर राहून कार्य करणारा नेता अशी अविनाश शिंदे यांची ओळख आहे.आंदोलने करून आणि वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून त्यांनी शिंदे यांनी विविध प्रश्न मार्गी लावले आहेत.वंचित बहुजन आघाडीच्या संघटनवाढीसाठीही त्यांनी आपले सर्वस्व पणास लावले आहे.विविध पक्षातील नेत्यांना त्यांनी वंचित बहुजन आघाडीत आणण्याची भूमिका बजावली आहे. त्यामुळेच ते पक्षश्रेष्ठींच्या गळ्यातील ताईत बनले आहेत,असे म्हटले तर ते अतिशयोक्तीपूर्ण ठरणार नाही.सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची तसेच त्यांचा आदर करण्याची कला शिंदे यांनी आत्मसात केल्याने कार्यकर्ताही त्यांच्यासाठी वाट्टेल ते करण्यास तयार असतो. आणि म्हणूनच दिग्गज उमेदवार मैदानात असतानाही यावेळी काही करून मतदारसंघात चमत्कार घडवायचा आणि शिंदे यांना आमदार करायचेच असा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला असून त्यासाठी संपूर्ण मतदारसंघ ते पिंजून काढत आहेत.
अविनाश शिंदे यांच्या प्रचारासाठी पक्षाची महिला आघाडी मोठ्या प्रमाणात सक्रिय झाली आहे. भाऊबीजेचे औचित्य साधून शेकडो महिलांनी रविवारी शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे औक्षण केले.बहिणींच्या या आगळ्या वेगळ्या आपुलकीने शिंदे आणि त्यांचे कुटुंबीय अक्षरशः भावूक झाले. तुम्हाला काय ओवाळणी हवी, असे शिंदे यांनी विचारले असता “आम्हाला काही नको तुम्हाला निवडून आणणे हाच आमचा निर्धार असून तीच आमची ओवाळणी असेल,” असे या महिलांनी सांगून एक प्रकारे शिंदे बद्दल आदर व्यक्त केल्याने मतदार संघात त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.काल दिवसभर हा औक्षणाचा सिलसिला सुरू होता.
विशेष म्हणजे या महिलांनीच निवडणूक लढविण्यासाठी शिंदे यांना आपापल्यापरीने खारीचा वाटा म्हणून आर्थिक मदतही दिली.