क्राईम

धुळे : कायद्याचा अंत्यसंस्कार, गुटखा माफियांचा राजमार्ग आणि दलाली तस्करीचा तो एक -नाथ, हप्तेखोरीचा सूरज!


धुळे : कायद्याचा अंत्यसंस्कार, गुटखा माफियांचा राजमार्ग आणि  दलाली

तस्करीचा तो एक -नाथ, हप्तेखोरीचा सूरज!

……….

Advertisement
धुळे शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून जाणारा महामार्ग आज अपघातप्रवण नाही, तो नैतिकदृष्ट्या मृत झाला आहे. कारण या रस्त्यावर अपघात होत नाहीत, इथे कायद्याची रोज हत्या होते. प्रतिबंधित गुटखा खुलेआम वाहून नेला जातो, पकडला जातो, आणि मग पोलीस आशीर्वादाने पुन्हा मोकळा केला जातो. हा प्रकार म्हणजे कायद्याची  अंमलबजावणी नव्हे, तर सर्रास  विक्री आहे.
काही  कार्यकर्ते गुटख्याने भरलेली पीकअप अडवतात. ११२ वर कॉल करतात. म्हणजे  यंत्रणेला कारवाईची  संधी दिली जाते. पण इथे यंत्रणा जनतेसोबत उभी राहत नाही, ती माफियाच्या बाजूने उभी राहते. “गाडीत गायी असाव्यात” हा बनाव म्हणजे तपास नव्हे, तो तपासाचा खून आहे. गायी नसल्याचे स्पष्ट होताच गाडी सोडली जाते. इतका सहज निर्णय? इतकी तत्परता? की आधीच ठरलेली डील?
हा वफादार शिपाई कुणाच्या आदेशावरून बोलला?
हा वफादार  शिपाई इतका आत्मविश्वासात कसा होता?
त्याला खात्री कशी होती की काहीही होणार नाही?
उत्तर स्पष्ट आहे, कारण त्याच्या मागे संपूर्ण हप्तेखोर यंत्रणा उभी आहे.
आज धुळ्यात पोलीस वर्दी म्हणजे संरक्षण नव्हे, तर माफियांची विमा पॉलिसी बनली आहे का असा सवाल या घटनेतून पुढे आला आहे.. गुटखा माफियांचा एक “नाथ” संपूर्ण परीक्षेत्रात मोकाट फिरतो. वरिष्ठ अधिकारी खुश ठेवले जातात. आकड्यांची भाषा चालते. कायद्याची नाही,  मोजणी होते. आणि कुजबुज नाही, ठाम चर्चा आहे  सर्वोच्च आकडा चक्क ३५ पर्यंत जातो.
३५ म्हणजे काय?? हजारो तरुणांच्या तोंडात जाणारा विषाचा करार?३५ म्हणजे सरकारी बंदीला लाथ मारून उभारलेली समानांतर सत्ता?
 आज गुटख्याची गाडी सोडली जाते, तर उद्या दारू, परवा ड्रग्स आणि मग थेट गुन्हेगारीचे साम्राज्य असेच  उभे राहीले आहे. कारण जिथे पोलीसच माफियांचे भागीदार असतात, तिथे गुन्हेगारांना कायद्याची भीती उरत नाही.
या प्रकरणात सर्वात गंभीर बाब म्हणजे आपली दुनियादारीच्या हाती आलेली व्हॉईस रेकॉर्डिंग.
रेकॉर्डिंग जर खरी असेल , तर हा प्रकार गैरसमज नाही, तो गुन्हेगारी कट आहे. हा केवळ एका पोलिस कर्मचाऱ्याचा प्रश्न नाही, हा पूर्ण साखळीचा प्रश्न आहे.  शिपाई, अधिकारी, दलाल आणि माफिया.
आज जर या प्रकरणावर पडदा टाकला गेला, तर उद्या धुळे जिल्हा विचारेल  पोलीस ठाणे आहे की माफियांचे कार्यालय?
वर्दी घातलेले रक्षक आहेत की हप्तेखोर नोकर?
आता केवळ चौकशी पुरेशी नाही. कारवाई झाली पाहिजे.
संबंधित कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची आर्थिक चौकशी,
व्
आणि गुटखा माफियांचा हा एक, “नाथ” सार्वजनिकपणे उघडा पाडला पाहिजे.
अन्यथा हे गृहित धरावे लागेल की धुळ्यात महतप्रयासाने सजीव झालेला कायदा पुन्हा संपविण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. इथे गुटखा माफियांचा राज्याभिषेक झाला आहे.
जाता जाता हेही लक्षात ठेवा,जनतेचा संयम संपला की,असे  संपादकीयही निवेदन राहत नाही,ते इशारा बनते.
दुनियादारी won’t lie

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *