ताज्या घडामोडी

स्वराज्याच्या इतिहासात शहागडाचे मोठे महत्त्व – मा.मंत्री बाळासाहेब थोरात शहागड स्वराज्याचे खरे जन्मस्थान – डॉ गणेश राऊत अमृतवाहिनी शिक्षण संस्थेत स्वराज्य संकल्पक शहाजीराजे वसा आणि वारसा व्याख्यान संपन्न


स्वराज्याच्या इतिहासात शहागडाचे मोठे महत्त्व – मा.मंत्री बाळासाहेब थोरात

शहागड स्वराज्याचे खरे जन्मस्थान – डॉ गणेश राऊत

अमृतवाहिनी शिक्षण संस्थेत स्वराज्य संकल्पक शहाजीराजे वसा आणि वारसा व्याख्यान संपन्न

 

संगमनेर (प्रतिनिधी)–

छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण जगाचे आराध्य दैवत आहे. त्यांचे जीवन चरित्र प्रत्येकासाठी मार्गदर्शक असून महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यामध्ये पेमगिरी येथील शहागडाचे मोठे महत्त्व असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले असून हिंदवी स्वराज्याची संकल्पना छत्रपती शहाजी महाराज यांनी शहागडावरून मांडली म्हणून खऱ्या अर्थाने शहागड हा हिंदवी स्वराज्याचे जन्मस्थान असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक तथा एच. व्ही. देसाई कॉलेज पुणे येथील इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. डॉ . गणेश राऊत यांनी केले आहे.

 

अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय, एमबीए आणि पेमगिरी सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वराज्य संकल्पक शहाजीराजे वसा आणि वारसा या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे सौ दुर्गाताई तांबे ,उद्योजक रोहित डूबे पाटील, ओराह न्यूट्रिकॅम कंपनीच्या डायरेक्टर सौ कविता डूबे, सौ शरयूताई देशमुख, सरपंच सौ द्वारकाबाई डूबे, शांताराम डूबे ,सौ सुंदराबाई डूबे, रावसाहेब दुबे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्रा. व्हि.बी धुमाळ, डॉ जे बी गुरव, डॉ एम ए व्यंकटेश, डॉ.बी एम लोंढे, यांच्यासह सर्व प्राचार्य उपस्थित होते.

Advertisement

 

यावेळी बोलताना इतिहास संशोधक डॉ.गणेश राऊत म्हणाले की, विविध शाह यांच्या जोखडातून जनतेला मुक्त करण्यासाठी स्वतःचे राज्य हवे ही संकल्पना शहाजीराजे यांनी शहागडावर मांडली. मुर्तुजा आदिलशहा याला गादीवर बसून त्यांनी आदिलशाहीचा कारभार पाहिला. समता बंधुता आणि लोकशाहीचा विचार घेऊन सर्वसामान्यांच्या विकासाचे स्वराज्य निर्माण व्हावे ही त्यांचे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराज यांनी साकारले. लोकशाहीची मूळ कल्पना देणाऱ्या स्वराज्याने देशाला नव्हे तर जगाला दिशा दिली. ही प्रेरणा आणि ऊर्जा घेऊन युवकांनी काम केले पाहिजे असे ते म्हणाले.

 

तर माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, हिंदवी स्वराज्यामध्ये पेमगिरीच्या शहागडाचे मोठे महत्त्व आहे. इतिहास अभ्यासताना सुरुवात शहागडापासून होते मग शिवनेरी ते रायगड या प्रवासामध्ये विविध किल्ल्यांनी स्वराज्याला भक्कम केले. एकतेचा आणि महाराष्ट्र धर्माचा हा विचार पुढे नेण्यासाठी सर्व समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज असल्याचे ते म्हणाले.

 

तर रोहित दुबे पाटील म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली पेमगिरीच्या शहागडाचा चांगला विकास झाला असून या ऐतिहासिक स्थळाचे संवर्धन करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे याचबरोबर पेमगिरी येथील महाकाय वटवृक्ष संगमनेर तालुक्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट असल्याचे ते म्हणाले.

 

याप्रसंगी डॉ मच्छिंद्र चव्हाण, डॉ. मनोज शिरभाते ,सौ जे.बी सेठी, अंजली कन्नावार, विलास भाटे, विठ्ठल दुबे ,राजाभाऊ दुबे, भीमाशंकर पांढरे ,स्वप्नील कोल्हे ,अमोल दुबे, यांच्यासह प्रेमगिरी मधील विविध कार्यकर्ते व युवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एमए व्यंकटेश यांनी केले तर प्रा. मयुरी गाडे व डॉ.वृषाली साबळे यांनी सूत्रसंचालन केले तर एम बी ए चे प्राचार्य डॉ. बी एम लोंढे यांनी आभार मानले.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *