*सन्मान लोकशाहीच्या आधारस्तंभाचा…!!*
*सन्मान लोकशाहीच्या आधारस्तंभाचा…!!*
मालपाणी हेल्थ क्लब अँड रिसॉर्ट संगमनेर येथे संगमनेर व अकोले तालुक्यातील पत्रकार बांधवांशी संवादातून परिवर्तन व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव विनंतीला मान देऊन या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला.Advertisementलोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटलं की पत्रकार हे नाव पहिलं आठवतं. लोकशाही टिकवण्यासाठी झटणाऱ्या आणि सत्याची बाजू सातत्याने मांडत राहणाऱ्या
जगात पत्रकारिता आहे म्हणून क्षणाक्षणाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत आहे. पत्रकारिता जेव्हा जगात आली तेव्हा या जगात क्रांती झाली. आपले मुद्दे, मतं मांडण्याचे हक्काचे व्यासपीठ मिळाले. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, विज्ञान-तंत्रज्ञान अशा अनेक मुद्द्यांची माहिती, ज्ञान आपल्याला यातून घेता येतय. नव्या जगाची ओळख होत आहे. त्यामुळे वर्तमानपत्राचे, वृत्त वाहिन्यांचे आणि न्युज पोर्टल्सचे आपल्या आयुष्यातील महत्त्व हे अनन्यसाधारण आहे.पत्रकार दिनानिमित्त अनेक पत्रकारांनी आपलं मनोगत व्यक्त केले त्यातून मराठी पत्रकारितेच्या इतिहासाला उजाळा मिळाला. उपस्थित सर्व पत्रकारांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या.



