ताज्या घडामोडी

हर फिक्र को धुए मे उडाता चला….* *आव्हानांना स्थितीप्रज्ञ सामोरे जाणारे खाकी व्यक्तिमत्व* 


*हर फिक्र को धुए मे उडाता चला….*

*आव्हानांना स्थितीप्रज्ञ सामोरे जाणारे खाकी व्यक्तिमत्व* 

…..

मै जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुए मे उडडाता चला गया |

साहिल लुधियानवी यांच्या या भावना डोळ्यासमोर आणतात तो एक गूढ, कर्तव्यप्रधान, आव्हानांना अगदी स्थितीप्रज्ञ राहून विचारपूर्वक पाऊल टाकणारा एक चेहरा. जबाबदारीशी समर्पित व्यक्तिमत्व. पोलिस निरीक्षक राजू सुर्वे.१९९१ ते २०२५…मुंबई ते नाशिक ग्रामिण पोलिस दल…या प्रवासात सहाय्यक पोलिस निरीक्षक पदापासून आर्थिक गुन्ह्यांची उकल करणाऱ्या नाशिक जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेचे काम समर्पित भावनेने करणारे हे व्यक्तिमत्व. त्यांच्या जन्म दिवसाच्या शुभेच्छा देतांना तितक्याच समर्पित भावनेतून पत्रकारितेच्या लेखणीतून साहिर लुधियान्वी यांच्या त्या भावना प्रसवल्या नाहीत तरच नवल.

राजू सुर्वे यांनी १९९१ मध्ये पोलिस दलात पदार्पण केल्यानंतर आपल्या सेवेची सर्वाधिक वर्ष मुंबई पोलिस दलात खर्ची घातली. अगदी अडीच वर्षांपूर्वी त्यांची मुंबईच्या बाहेर म्हणजे नाशिक जिल्ह्यात बदली झाली आणि नाशिक जिल्हा पोलिस दलात इगतपुरी पोलिस ठाणे ते स्थानिक गुन्हे शाखा आणि आता ग्रामिण आर्थिक गुन्हे शाखा असा त्यांचा कार्यप्रवास राहिला.

महाराष्ट्र पोलिस दलाला भेडसावणारी अपुरे मनुष्य बळ आणि मर्यादित संसाधने ही समस्या राजू सुर्वे यांनाही भेडसावली. मात्र खाकीची प्रतिष्ठा जपणाऱ्या अन्य सहकाऱ्यां प्रमाणे सुर्वे यांनी कर्तव्याला प्राधान्य देऊन येणारे प्रत्येक आव्हान पेलले.

इगतपुरी सारख्या संवेदनशील आणि मुंबईशी जवळीक साधणाऱ्या तालुक्यात कायदा सुव्यवस्था राखणारे पोलिस निरीक्षक आणि त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचा कारभार पाहणारे पोलिस निरीक्षक राजू सुर्वे यांची हातोटी ज्यांनी जवळून पाहिली त्यांना त्यांच्या समर्पित भावनेविषयी वेगळं सांगण्याची गरज नाही.

एलसीबी प्रमुख म्हणून त्यांचा हातखंडा खरंच कौतुकास्पद आहे. राजकीय वातावरणातील बदली व तणाव, क्लिष्ट गुन्हे उकलण्याचे तांत्रिक आणि मानसिक आवाहन, सुरक्षिततेचा धोका व सामाजिक दबाव,मर्यादित संसाधनातून नाविन्यपूर्ण मार्ग शोधणे हे त्यांनी ब्रह्मांडी तेच पिंडी सामावून घेतले, अशी व्यक्ती मनाने इतकी शांत राहते हेच मुळी नवल आहे!! लहानपणापासूनच आव्हानात्मक आणि शिस्तप्रिय कार्यक्षेत्राची मनीषा असलेले सुर्वे त्यांच्या या आवडीमुळे त्यांच्या ठायी आलेले आव्हान पेलू शकतात. हा त्यांचा स्वभाव पैलू त्यांच्या बोलण्यातून नेहमी जाणवतो.

Advertisement

कोयना कृष्णाच्या संगमस्थानी आणि सप्तऋषी पैकी एक वैदिक ऋषीं महर्षी भ्रूगू यांचे तपस्थान असलेले आणि समर्थ रामदास यांचा सज्जनगड असलेल्या सातारा जिल्ह्यात जन्म, एका खाजगी कंपनीत काम करणारे संपत सुर्वे तथा गृहिणी असणाऱ्या सूशीला सुर्वे या दांपत्याच्या पोटी झाला . शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण साताऱ्यातच पूर्ण झाले असल्याने समर्थ रामदास,छत्रपती शिवाजी महाराज,श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई, क्रांतीसिंह नाना पाटील, डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले सावित्रीबाई फुले, स्वराज छोटा गंधर्व या सातारा जिल्ह्याला लाभलेले महान विभूतींचे वैचारिक बाळकडू उपजत लाभले. आपले करिअर एका युनिफॉर्म मध्ये असावे,या दृढ निश्चयाने महाराष्ट्र पोलीस दलाला एक झुंजार पोलीस निरीक्षक मिळाला.ही अभिमानाची बाब आहे. त्यात स्थानिक गुन्हे शाखा नाशिकची जबाबदारी पार पडत असताना त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी 2024 चा केंद्र सरकारचा राष्ट्रपती पोलीस पदक पुरस्कार बहाल झाला. दोन वेळा पोलीस आयुक्त व एक पोलीस महासंचालक मानचिन्ह समर्पित कर्तृत्वाचा गौरव करून गेले. आपल्या कारकीर्दीत 140 पेक्षा जास्त पदकांना सुर्वे यांनी गवसणी घातली.

 

 अल्पावधीतच आपल्या कार्य कुशलतेने इगतपुरी शहर आणि परिसरातील गुन्हेगारींचा बिमोड करून कायदा व सुव्यवस्था राखून शांतता प्रस्थापित करण्यासाठी भरीव कामगिरी त्यांनी केली. दाऊद इब्राहिम, छोटा राजन,छोटा शकील, रवी पुजारी,सुरेश पुजारी अशा गुन्हेगारी टोळ्यांमधील 125 पेक्षा जास्त गुन्हेगारांना अटक करून त्यांच्यावर दोषारोप पत्र दाखल करण्याचे कार्य सुर्वे यांनी चोख बजावले. एक वर्षापेक्षा अधिक काळ खुनाच्या गुन्ह्यात हवे असलेले गुन्हेगार जेरबंद करणे, एक कोटी पेक्षा जास्त गुटखा साठा जप्त करणे अवैध मद्य विक्रीवर धाडी मारणे,गुन्हेगारी गट तटाशी दोन हात करताना देखील त्यांच्यातील माणुसकीचा झरा अनेक प्रसंगातून वाहिलेला आम्हा पत्रकारांनी बघितला आहे. मग ते अपघाती व्यक्तीला वाचवणे असो किंवा त्या पंधरा दिवसाच्या बाळावर स्थिरावलेला आपुलकीचा हात असो…

१९९१ ला पोलीस शिपाई पदावर रुजू झाल्यापासून ते सरळ सेवा अंतर्गत 2010 मध्ये उपनिरीक्षक पदावर बढती, सातारा ते मुंबई खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा मानखुर्द व खार, पोलीस निरीक्षक इगतपुरी ते पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नाशिक या सर्व प्रवासात आपल्यातला माणूस आणि खाकीतला दर्दी परफेक्ट जपणारा हा अवलिया…

 वाढदिवसाच्या अखंड शुभेच्छा साहेब!!!

सलाम आपल्या कार्याला…

मार्कंडेय प्रकाशन नासिक

आपली दुनियादारी…

रश्मी मारवाडी


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *