मोदी @11 :भाजप -जनसेवा सेवाभावी संस्थेचा संयुक्त उपक्रम ; घाटकोपर नायडू कॉलनीत फळ झाडांचे रोपण
मोदी @11 :भाजप -जनसेवा सेवाभावी संस्थेचा संयुक्त उपक्रम ;
घाटकोपर नायडू कॉलनीत फळ झाडांचे रोपण
घाटकोपर प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाल्याच्या प्रित्यर्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशपातळीवर विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पक्षाच्या घाटकोपर विक्रोळी मंडळ आणि जनसेवा सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. प्रीती उपध्याय भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा अध्यक्ष घाटकोपर यांचे नेतृत्वात घाटकोपरच्या नायडू कॉलनीत शुक्रवार , दि. 4 जुलै 2025 रोजी फळ झाडांचे रोपण करण्यात आले.
घाटकोपर पूर्व विधानसभा क्षेत्रात पर्यावरण संवर्धन हेतूने भाजप व जनसेवा सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नायडू कॉलनी समता नगर मध्ये जिल्हाध्यक्ष दीपक दळवी यांच्या हस्ते संपन्न झालेल्या वृक्षारोपण उपक्रमात रवी पुज, मुकूंद काकड, संघदिप केदारे, प्रिती उपाध्याय, सविता कापसे, शशिकांत घोडके , हरीश बोलार (मामा), राणा सिंग, सचिन सकट, वैभव पाचपुते,विमल सांगळे,रेणुका राउल, मंदा दिघे, अलका निकाजे, अमोल सोनवणे, संदीप शिंदे, आशुतोष केदार, रेवती सपकाळ,वैशालीताई प्रितेश काविस्कर, हिरा मानरळ, रामदास भोर, अक्षय घुगे युवा पदाधिकारी उपस्थित होते.