प्रहार जनशक्ती पक्षाच्या सिन्नर कार्यकारणीत अंशतः फेरबदल ; दत्तात्रय लोंढे नूतन युवा तालुकाध्यक्ष, तर योगेश कहांडळ यांच्यावर कामगार संघटनेची जबाबदारी
प्रहार जनशक्ती पक्षाच्या सिन्नर कार्यकारणीत अंशतः फेरबदल ;
दत्तात्रय लोंढे नूतन युवा तालुकाध्यक्ष, तर योगेश कहांडळ यांच्यावर कामगार संघटनेची जबाबदारी
सिन्नर प्रतिनिधी
प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शरद शिंदे यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकारिणीत अंशतः फेरबदल केले आहेत. या नव्या बदलानुसार वावी पूर्व भागातील शेतकरी नेते दत्तात्रय लोंढे यांच्यावर युवा तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून सिन्नर तालुक्यातील कामगारांच्या प्रश्नांची जाण असणारे योगेश कहांडळ यांची कामगार संघटनेच्या सिन्नर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जिल्हा उपाध्यक्ष संतोष गायधनी कामगार जिल्हा अध्यक्ष कमलाकर शेलार तालुका अध्यक्ष कैलास दातीर कार्याध्यक्ष विलास खैरनार जिल्हा उपाध्यक्ष वैशाली अनवट महिला तालुकाध्यक्ष पुष्पा भोसले कार्याध्यक्ष आशाताई गोसावी महिला शहरातील संगीता आगळे अँड प्रभारी कांचन भालेराव तक्रार निवारण समिती अध्यक्ष गणेश मस्के शेतकरी अध्यक्ष चंद्रकांत डावरे अल्पसंख्याक अध्यक्ष राज्य सय्यद ओबीसी अध्यक्ष ज्ञानेश्वर काकड संपर्कप्रमुख सुनील जगताप उपाध्यक्ष प्रकाश थोरात गटप्रमुख रामजी शिंदे गटप्रमुख दशर स्थानक दत्तू बोडके अँड राहुल रोकडे उपाध्यक्ष खंडू बिन्नर कपिल कोठुरकर, ठाणगाव गट प्रमुखांसह कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांचा दोन-तीन दिवसात सत्कार करण्यात येईल अशी माहिती तालुका अध्यक्ष कैलास दातीर यांनी दिली आहे.