एस जी पब्लिक स्कुल सिन्नर केंद्राची दहावी परीक्षेसाठी आसनव्यवस्था जाहीर
एस जी पब्लिक स्कुल सिन्नर केंद्राची दहावी परीक्षेसाठी आसनव्यवस्था जाहीर
सिन्नर : प्रतिनिधी
माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीची बोर्ड परीक्षा २० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या परीक्षेसाठी सिन्नर येथील एस जी पब्लिक स्कुल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय – केंद्र क्रमांक १५५६ – या केंद्रात एकूण ४४४ विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था जाहीर करण्यात आली आहे.
या केंद्रावर एस जी पब्लिक स्कूल व ज्यु कॉलेज सिन्नर, एस जी पब्लिक स्कुल इंग्रजी माध्यम सिन्नर,छत्रपती शिवाजी विद्यालय गुळवंच, मुसळगाव हायस्कुल मुसळगाव तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर दातली, अशा पाच शाळांचे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
Advertisement
एस जी पब्लिक स्कुल केंद्र क्रमांक १५५६ वर एस एस सी बोर्ड परीक्षा बैठक क्रमांक D086122 ते Do86613 याप्रमाणे प्रमाणे एकूण ४४४ विद्यार्थ्यांची इमारत B मध्ये खोली क्र. B1 ते खोली क्र B23 पर्यंत एकूण 19 ब्लॉक्स मध्ये परीक्षेसाठी बैठकव्यवस्था करण्यात आली आहे असे विद्यालयाचे प्राचार्य चौधरी यांनी सांगितले. विद्यार्थी बैठक व्यवस्था, हवेशीर इमारत,परीक्षेसाठी लाईट व फॅनयुक्त सुसज्ज वर्ग खोल्या, अद्यावत सीसीटीव्ही प्रणाली,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तसेच अपत्कालीन वैदयकीय अधिकारी व्यवस्था पोलिस बंदोबस्त याची चोख व्यवस्था केली असल्याचे केंद्र संचालक – श्री विलास सातपुते यांनी सांगितले. उपकेंद्र संचालक -श्री बाबाबासाहेब मनोहर बोडके , तर स्टेशनरी सुपरवाईझर म्हणून -अविनाश गुंजाळ हे कामं पाहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.बाहेरून येणाऱ्या परीक्षार्थींना परीक्षेसाठी तणावरहित पोषक वातावरणात उत्तमोत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, तसेच उद्धीष्टाधिष्टीत परीक्षा चांगल्या प्रकारे पार पडण्याचे आवाहन मालोशी मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख यांनी केले आहे.



