ताज्या घडामोडी

अमृतवाहिनीतील एचआर कॉनक्लेव्ह मधून उद्योग – तंत्रशिक्षणाचा नवा अध्याय उद्योग व उच्च शिक्षणातील 200 प्रतिनिधींच्या सहभागात कार्यशाळा संपन्न अमृतवाहिनीतून जागतिक उद्योगांच्या अपेक्षांना पूरक विद्यार्थी घडतील – डॉ.पी.बी.कोटटूर


अमृतवाहिनीतील एचआर कॉनक्लेव्ह मधून उद्योग – तंत्रशिक्षणाचा नवा अध्याय

 

उद्योग व उच्च शिक्षणातील 200 प्रतिनिधींच्या सहभागात कार्यशाळा संपन्न

 

अमृतवाहिनीतून जागतिक उद्योगांच्या अपेक्षांना पूरक विद्यार्थी घडतील – डॉ.पी.बी.कोटटूर

 

संगमनेर ( प्रतिनिधी )

स्पर्धात्मक युगात तांत्रिक ज्ञानाबरोबर संवाद कौशल्य, समस्या सोडवण्याची क्षमता, डिजिटल साक्षरता आणि बदलांना स्वीकारण्याची मानसिकता या गुणांचे संवर्धन व्हावे याच बरोबर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील उद्योगांना अपेक्षित कार्य कुशल तंत्रज्ञ निर्माण व्हावे या उद्देशाने अमृतवाहिनी शिक्षण संस्थेत आयोजित एचआर कॉन्क्लेव्ह मुळे उद्योग व शिक्षणामधील नवा अध्याय निर्माण झाले असल्याचे गौरवउद्गार एल अँड टी टेक्नॉलॉजीचे ग्लोबल हेड डॉ. पी. बी कोटटूर यांनी काढले असून या कार्यशाळेमध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांसह 200 प्रतिनिधींनी सहभाग घेतला.

अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात मेधा 2026 अंतर्गत झालेल्या एचआर कॉन्क्लेव्ह मध्ये ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ शरयूताई देशमुख, अमिटी विद्यापीठ बंगलोरचे डॉ तुषार सोमनाथे, एच सी एलच्या कांचन खेडकर, एलईडी झिबिया कार्पोरेशनचे जनरल मॅनेजर गुंजन सैनी, प्राचार्य डॉ. एम ए व्यंकटेश, अकॅडमी डायरेक्टर डॉ.जे बी गुरव, प्रा. व्हि.बी. धुमाळ, डॉ. मच्छिंद्र चव्हाण , डॉ. मनोज शिरभाते, डॉ राजेंद्र वाघ,डॉ. बाबासाहेब लोंढे, प्रा जीबी काळे, प्रा. विजय वाघे विलास भाटे, यांच्यासह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या व विविध संस्थांचे ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर सह 200 प्रतिनिधी उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना डॉ. कोटटूर म्हणाले की, माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अमृतवाहिनी संस्थेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवलेल्या विविध उपक्रमामुळे गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडत आहे. एच आर कॉन्क्लेव्ह मुळे विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय उद्योगांना हवे असलेले कार्य कुशल तंत्रज्ञ आणि अमृतवाहिनी शिक्षण संस्था यामध्ये समन्वय घडून विद्यार्थ्यांना नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहे. येणाऱ्या काळामध्ये 2 नॅनोमीटर चिप्स ,सेमीकंडक्टर आयसी, ए आय समिट इंडिया यासारख्या महत्त्वपूर्ण घडामोडींचा उल्लेख करताना आंतरराष्ट्रीय व औद्योगिक सहकार्य महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले या अभिनव उपक्रमामुळे उद्योग क्षेत्रात होणारे बदल विद्यार्थ्यांना करियर साठी मार्गदर्शक ठरतील असेही ते म्हणाले.

Advertisement

तर जेनेरिटी एआयमुळे टॅलेंट एक्वायझेशन मध्ये होत असलेल्या बदलांमध्ये विकसित करावयाची कौशल्य व मानसिकता या विषयावर आम्ही टी विद्यापीठ बंगलोरचे डॉ. तुषार सोमनाथ , कांचन खेडकर, डॉ गुंजन सैनी ,स्वप्नकांत समल यांनी सहभाग घेतला. तर कौशल्यातील दरी भरून काढत उद्योग सज्ज व तत्पर मनुष्यबळ निर्मिती या विषयावर झालेल्या चर्चेत इन्फोटेक सॉफ्टवेअरच्या एच आर मॅनेजर मनीषा खोमणे, राजू यादव , अमेरिकन एक्सप्रेसच्या हरप्रिया वालिया , एक्यूमर फार्माचे निलेश खैरे, अर्शद सय्यद, डॉ किशोर भदाणे यांनी सहभाग घेतला.

 

तर उद्योग सिद्ध करिअरचे मार्ग या विषयावर हिल्टन ग्रुपच्या हर्षा वल्लारी, दाना आनंद इंडिया लिमिटेड चे सुरज दजल हार्मनी ऑरगॅनिक लिमिटेड चे मुख्य मानव संसाधन अधिकारी सुहास खांबे ग्लेनमार्क फार्मासिटिकल चे डॉ सचिन कुशिरे, गिरीश पाल व डॉ विष्णू वाकचौरे यांनी सहभाग घेतला. एआय मुळे होणारे बदल, उद्योग क्षेत्र आणि उच्च तंत्र शिक्षण यावर सविस्तर चर्चा होऊन देश विदेशातील 200 प्रतिनिधी आगामी काळात विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करावयाच्या क्षमता व उपलब्ध संधी यावर चर्चा केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंजीनियरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ एमए व्यंकटेश यांनी केले. तर एमबीए कॉलेजचे संचालक डॉ बी एम लोंढे यांनी आभार मानले.

 

या यशस्वी उपक्रमाबद्दल राज्याचे माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात, मा. आ. डॉ सुधीर तांबे, व्यवस्थापकीय संचालक सौ.शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा व्ही बी धुमाळ, डॉ.जे बी गुरव, यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.

 

चौकट

 

एचआर कॉन्क्लेव्ह मुळे अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील तज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली आहे. या चर्चासत्रामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय उद्योगांमधील 200 प्रतिनिधींच्या सहभागामुळे करिअरच्या संधी, उद्योग क्षेत्रात होणारे नवनवीन बदल, एआई तंत्रज्ञानासह विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत बदल होणार असून हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *