राऊड घाटात एस टी बसचा भीषण अपघात सहा जणांचा मृत्यू
राऊड घाटात एस टी बसचा भीषण अपघात
सहा जणांचा मृत्यू
चांदवड प्रतिनिधी
*मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड जवळ भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. राऊड घाटात एसटी बस आणि ट्रकमध्ये हा अपघात सकाळी साडेनऊ वाजता झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात मृताचा आकडा वाढण्याची शक्यता आहे*
सकाळी झालेल्या या भीषण अपघातानंतर स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. तर पोलिस घटनास्थळी पोहचले. बसचे टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.