क्राईम

सीसीटीव्ही डीव्हीआर चोरणारी टोळी जेरबंद; १९ डीव्हीआरसह साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त; पंचवटी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; दोन आरोपी अटकेत


सीसीटीव्ही डीव्हीआर चोरणारी टोळी जेरबंद; १९ डीव्हीआरसह साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त;

पंचवटी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; दोन आरोपी अटकेत

 

नाशिक, प्रतिनिधी : पंचवटी परिसरातील इमारतींमध्ये बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे डीव्हीआर चोरणाऱ्या दोन आरोपींना पंचवटी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली असून त्यांच्या ताब्यातून विविध कंपन्यांचे १९ डीव्हीआर, चोरीसाठी वापरलेली दुचाकी आणि अन्य मुद्देमाल असा एकूण ६ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

१५ जून २०२६ रोजी प्रोफेसर कॉलनी, हनुमानवाडी, पंचवटी येथील एका सोसायटीमधून सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआर चोरीला गेला होता. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३५९/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-१) मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त (पंचवटी विभाग) शेखर देशमुख तसेच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता.

गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाठ व पोलीस हवालदार कैलास शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हनुमानवाडी ते चोपडा लॉन्सकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

Advertisement

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत – १) समीर अयुब शहा (वय २५), रा. गल्ली क्रमांक १, मेहबूबनगर, पहाडगाव, गांधीनगर, नाशिक. २) आमिर नूर खान (वय २३), रा. गल्ली क्रमांक २, मेहबूबनगर, पहाडगाव, गांधीनगर, नाशिक.

चौकशीदरम्यान आरोपींकडून एमएच-१५-केएम-९८८२ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची सुजुकी बर्गमन मोपेड तसेच HIKVISION, CP-PLUS आणि DAHUA कंपनीचे एकूण १९ डीव्हीआर पंचासमक्ष जप्त करण्यात आले. आरोपींनी पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक ३३४/२०२६ मधील चोरीचीही कबुली दिली आहे.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल

HIKVISION कंपनीचे विविध मॉडेलचे डीव्हीआर – १० नग

CP-PLUS कंपनीचे विविध मॉडेलचे डीव्हीआर – ८ नग

DAHUA कंपनीचा डीव्हीआर – १ नग

सुजुकी बर्गमन मोपेड (एमएच-१५-केएम-९८८२)

एकूण जप्त मुद्देमाल : १९ डीव्हीआर, एक दुचाकी एकूण किंमत : ६,३५,००० रुपये

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाठ, पोलीस हवालदार कैलास शिंदे, अमीन कुरेशी, मोहन नांदुडीकर, संतोष पवार, जयवंत लोणारे, युवराज गायकवाड, वैभव परदेशी, सचिन बाहिरे, अमोल देशमुख, नितीन पवार, आगोले, चित्रे, तोष पाटील, वाघमारे, जाधव, भोईर तसेच पंचवटी पोलीस ठाण्यातील इतर अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला.

पोलिसांनी या कारवाईत अनेक चोरीचे डीव्हीआर हस्तगत केले असून, शहरातील इतर ठिकाणी झालेल्या अशाच चोरीच्या गुन्ह्यांबाबत आरोपींकडे सखोल चौकशी सुरू आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *