यूएईमार्फत जागतिक व्यवसाय विस्तारासाठी नाशिकमध्ये फिक्कीच्या बी२बी बैठकांचे आयोजन
यूएईमार्फत जागतिक व्यवसाय विस्तारासाठी नाशिकमध्ये फिक्कीच्या बी२बी बैठकांचे आयोजन
नाशिक प्रतिनिधी :
फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) आणि गव्हर्नमेंट ऑफ शारजाह यांच्या संयुक्त विद्यमाने “यूएईमार्फत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत व्यवसाय विस्तार” या विषयावर नाशिकमध्ये विशेष बी२बी बैठकींचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठका दि. १९ आणि २० मे २०२६ रोजी रेडिसन ब्लू हॉटेल पाथर्डी फाटा येथे पार पडणार आहेत.
या उपक्रमाचा उद्देश उद्योगपती आणि उद्योजकांना यूएईमध्ये व्यवसाय सुरू करण्याच्या संधींबाबत माहिती देणे हा आहे. विशेषतः सैफ झोन (saif zone ) या अत्याधुनिक, किफायतशीर आणि गुंतवणूकदारांसाठी अनुकूल फ्री झोनची माहिती यावेळी देण्यात येणार आहे. तसेच यूएई हे मध्य पूर्व, आफ्रिका, युरोप आणि इतर जागतिक बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळवून देणारे महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र कसे ठरू शकते, याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या बी२बी बैठकींमध्ये सहभाग विनामूल्य असून, मर्यादित जागांमुळे पूर्वनोंदणी अनिवार्य आहे.
नोंदणी व बैठक स्लॉट निश्चितीसाठी इच्छुकांनी श्री. आशुतोष यांच्याशी ९६५०९०३२९९ या क्रमांकावर संपर्क साधावा.



