क्राईमताज्या घडामोडी

*अशोक खरात प्रकरणात नामकर्ण आवारे यांना अखेर अटक; पोलीस कोठडीतून न्यायालय कोठडी, न्यायालयीन कोठडीतून पोलीस कोठडीत खरातची वरात* 


*अशोक खरात प्रकरणात नामकर्ण आवारे यांना अखेर अटक; पोलीस कोठडीतून न्यायालय कोठडी, न्यायालयीन कोठडीतून पोलीस कोठडीत खरातची वरात* 

सिन्नर | प्रतिनिधी

महिलांचे लैंगिक शोषण, आर्थिक गैरव्यवहार आणि अंधश्रद्धेच्या कथित प्रकारांमुळे चर्चेत आलेल्या भोंदू ‘कॅप्टन’ अशोक खरात प्रकरणात आता नविन धागेदोरे उलगडून पोलिसांचा तपास सुरु झाला आहे. याच धागेदोऱ्याच्या अनुषंगाने प्रकरणात सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीचे चेअरमन नामकर्ण आवारे यांना सिन्नर पोलिसांनी अटक केली आहे.

 

 

अशोक खरातला १८ मार्च रोजी नाशिक गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. तेव्हापासून पोलीस कोठडीतून न्यायालय कोठडीत आणि न्यायालय कोठडीतून पुन्हा पोलीस कोठडी अशी अशोक खरातची वरात सुरु आहे. तपासादरम्यान जगदंबा पतसंस्थेतील संशयास्पद आर्थिक व्यवहार आणि बनावट खात्यांची माहिती समोर आल्याने पोलिसांनी तपासाची दिशा आर्थिक व्यवहारांकडे वळवली.

Advertisement

 

याच पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास पोलिसांनी नामकर्ण आवारे यांना सिन्नर येथील औद्योगिक वसाहतीच्या कार्यालयातून ताब्यात घेतले. जगदंबा पतसंस्थेतील बनावट खात्यांमधील व्यवहार, आर्थिक देवाणघेवाण आणि संबंधित कागदपत्रांबाबत पोलिसांनी त्यांची चौकशी केली.

मात्र, चौकशीदरम्यान समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने सायंकाळी पोलिसांनी आवारे यांना अटक केली. दरम्यान, अशोक खरातला सिन्नर पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणात आर्थिक व्यवहारांची साखळी, संबंधित व्यक्तींचे संबंध आणि कथित नेटवर्कचा तपास सुरू असून, आगामी काळात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *