ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर सरपंचांनाच मुदतवाढ देण्यात यावी. —- नामदेवराव कोतवाल.


 

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर सरपंचांनाच मुदतवाढ देण्यात यावी.
—- नामदेवराव कोतवाल.

सिन्नर प्रतिनिधी

सिन्नर तालुक्यातील ११४ पैकी १०० ग्रामपंचायतीवर लोकनियुक्त राजवटीची मुदत संपणार आहे..तालुक्यात विस्तार अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्याने प्रशासक म्हणून त्यांच्याकडुन १०ते १२ ग्रामपंचायतीचा कारभार हाकणे शक्य नसल्याने त्यामुळे प्रशासक म्हणून लोकांमधुन निवडुन आलेल्या सरपंचांनाच मुदतवाढ देण्यात यावी.
अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी शहराध्यक्ष नामदेवराव कोतवाल यांनी केली आहे.
या मागणीचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेल द्वारे पाठवले आहे.

तालुक्यातील १०० ग्रामपंचायतीची मुदत फेब्रुवारी अखेरीस संपत असल्याने त्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याच्या गतीमान हालचाल सुरू झाल्या आहे. तालुका पंचायत समितीने जिल्हा परिषदेकडे प्रशासक नियुक्तीचा प्रस्ताव पाठवला असल्याचे समजते..तथापी तालुक्यात मुदत संपलेल्या ग्रामपंचायती व विस्तार अधिकाऱ्यांच्या संभाव्य जबाबदारीतील संख्येत मोठी विषमता आहे. विविध विभागांचे ९ विस्तार अधिकारी प्रशासनात असल्याने एकाच विस्तार अधिकाऱ्यांकडे १२/१३ ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळावा लागणार आहे.

Advertisement

यामुळे ग्रामपंचायतीचा दैनंदिन कारभार विस्कळीत होण्याची खूप मोठी शक्यता आहे.त्यातुन ग्रामस्थांना विविध अडचणीतुन गैरसोयी निर्माण होऊन विकास कामांवर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो.. त्यामुळे जनतेतुन निवडुन आलेल्या ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंचांना प्रशासक म्हणून मुदतवाढ दिल्यास ग्रामविकासाच्या दृष्टीने योग्य ठरेल.. शिवाय ग्रामपंचायत चालवण्याचा पाच वर्षांचा गाढा अनुभव त्यांच्याकडे असल्याने विद्यमान सरपंचांकडुन गावगाड्याचा लोकहितपयोगी कारभार सुरळीतपणे चालेल. त्यामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून सरपंचांना मुदतवाढ देण्यात यावी.असे मत श्री कोतवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *