क्राईम

वर्दीतील नवदुर्गाचा व्हाईस ऑफ मीडिया महिला विंग कडून सन्मान…


वर्दीतील नवदुर्गाचा व्हाईस ऑफ मीडिया महिला विंग कडून सन्मान…

 

संगमनेर प्रतिनिधी

नवरात्रीचे औचित्य साधून घरदार सांभाळून पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात भरारी घेणाऱ्या संगमनेर शहर पोलीस स्टेशन मधील महिला पोलीस या वर्दीतील नवदुर्गाचा सत्कार व्हाईस ऑफ मीडिया महिला विंगच्या वतीने करण्यात आला.

शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलिसांना टिफिन बॉक्स व गुलाब पुष्प देऊन त्यांच्या कार्याचा गौरोउल्लेख करून त्याना सन्मानित करण्यात आले.

यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख,उपपोलीस निरीक्षक श्रीकांत सावंत, व्हाईस ऑफ मीडिया महाराष्ट्रचे मुख्य संयोजक तथा संचालक कार्यवाहक गोरक्षनाथ मदने, राज्य कोअर कमिटी सदस्य अमोल मतकर, पत्रकार भारत रेघाटे, सुभाष भालेराव, महिला विंग जिल्हाध्यक्ष वैशाली कुलकर्णी, जिल्हा सचिव नीलिमा घाडगे उपस्थित होत्या. तसेच महिला पोलीस पोलीस नाईक लता जाधव, सुजाता थोरात,चारुशीला गोणके,तारा चांडे,अरुणा गभाले,सुवर्णा नवले,जया गभाले,मनिषा पुरी,किरण कातोरे,सोमेश्वरी शिंदे,अनिता सरगच्चे,संगीता डुंबरे,अनिता गीते,आरती पानसरे, छाया बढे,निशा घोडे आदी पोलीस कर्मचारी कार्यरत असून प्रातिनिधिक स्वरूपात नारी शक्तीचा यावेळी सन्मान करण्यात आला महिला विंगतर्फे वैशाली कुलकर्णी यांनी या उपक्रमाचा हेतू स्पष्ट केला,महिला पोलिसांनी धावपळीच्या जीवनशैलीत आपल्या आरोग्याकडे ही लक्ष द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

Advertisement

यावेळी प्रतिनिधिक स्वरूपात महिला पोलीस लता जाधव म्हणाल्या की, आज पत्रकारांकडून हा सत्कार स्वीकारताना आनंद झाला. आम्ही आमच्या कर्तव्यावर दक्ष असताना आम्हाला कौटुंबिक सर्व आघाड्या देखील सांभाळाव्या लागतात.प्रसंगी आम्हाला कधी कठोर तर कधी कोमल बनावे लागते,समाजातील अन्यायग्रस्त महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो.नारी ही अबला नसून,तिच्यात अपार सहनशक्ती आहे. आणि अन्याया विरोधात हीच कालिकाही बनते. असं मनोगत व्यक्त केलं.

व्हाईस ऑफ मीडियाने राबवलेल्या या उपक्रमाचं संगमनेर पोलिसांनी कौतुक केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *