२८ सप्टेंबर २०२५ शहिदेआझम भगतसिंह यांची ११८ वी जयंती
२८ सप्टेंबर २०२५ शहिदेआझम भगतसिंह यांची ११८ वी जयंती
शहिद जीवन संतोष लक्ष्मण डामसे यांना महामित्र व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड याच्या वतीने आदरांजली
सिन्नर प्रतिनिधी
*२८ सप्टेंबर २०२५ शहिदेआझम भगतसिंह यांची ११८ वी जयंती व शहिद जीवन संतोष लक्ष्मण डामसे यांना महामित्र व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड याच्या वतीने. आदरांजली वाहण्यात आली*
या कार्यक्रमाची सुरुवात शहिद भगतसिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली
*या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले* की देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत-हसत प्राणांचे बलिदान देणाऱ्या आणि अनेक पिढ्यांना प्रेरणादायी असं जीवन जगलेले क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांची आज २८ सप्टेंबर जयंती. भगतसिंग म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामतील एक क्रांतिकारक होती. या वादळानं ब्रिटिश राजवटीला सळो की पळो करून सोडलं होतं. तर, दुसरीकडं देशाच्या स्वातंत्र्यासाठी वेगवेगळ्या लढणाऱ्या संस्था, संघटना व व्यक्तींना एकत्र आणण्याचं काम केलं. भगतसिंग यांच्या जहाल विचारांमुळं भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीला कमालीचा वेग आला. आजही प्रत्येक भारतीय त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेतो. भारतमातेच्या या थोर सुपुत्राची जयंती देशभरात अत्यंत उत्साहात साजरी केली जाते.अशा महान क्रांतिकारक जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन तसेच
*नाशिक जिल्ह्यातील आंबे बाहुला गावचे सूपुत्र भारतीय सैन्य शुर शहिद जीवन संतोष लक्ष्मण डामसे* हे अरुणाचल प्रदेश येथे आपल्या कर्तव्य बजावत असताना देशसेवेत आपल्या मातुभूमीच्या रक्षणासाठी आपले संपूर्ण जीवन सपिॅत करणाऱ्या या शूर जवानास भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली व इन्कलाब झिंदाबाद भारत माता की जय अमर रहे अमर रहे शहिद जीवन संतोष डामसे रहे या घोषणा देणे आले दोन मिनिट उभाराहुने आदरांजली वाहण्यात आली
*या कार्यक्रमाचे सुञसंचलन रुपेश मुठे यांनी केले.व प्रास्ताविक विजय मुठे केले तर आभार अमोल चांडक यांनी मानले*
याप्रसंगी महामित्र दत्ता वायचळे आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे, मा.नगरसेवक रूपेशभाऊ मुठे, लखन पाचोरे, दिलीप सोनवणे, अमोल चांडक, प्रविण लुतुरे,सारंग बागुल, कपिल पाधा, पकंज गवते,लुतुरे आदि.उपस्थित होते