घाटकोपरमध्ये भाजपच अजिंक्य :काकड स्थानिक नागरिकांना सातशे छत्र्यांचे वाटप
घाटकोपरमध्ये भाजपच अजिंक्य :काकड
स्थानिक नागरिकांना सातशे छत्र्यांचे वाटप
घाटकोपर प्रतिनिधी
घाटकोपर पूर्व जनसेवा सेवाभावी संस्था व भारतीय जनता पार्टी व यांच्या वतीने,स्थानिक गरजू नागरिकांना ७०० छत्र्यांचे वाटप करण्यात आले. माता रमाबाई आंबेडकर नगर गंधकुटी विहार व समाधान सोसायटी, दक्षता सोसायटी मधील गरजू नागरिकांना मोफत छत्र्या वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
घाटकोपरचे आमदार पराग भाई शहा यांच्या हस्ते यावेळी भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र उपाध्यक्ष मुकुंद काकड,मंडळ अध्यक्षा अर्पिता शेलार, संघदिप केदारे, हरीश बोलाट (मामा), रामदास भोर, अक्षय घुगे, शशिकांत घोडके, सविता कापसे, राणा सिंग, सचिन सकट, वैभव पाचपुते विलास बच्छाव, विमल सांगळे, रेणुका राउल, प्रीती उपाध्य,मंदा दिघे, रेवतीताई, उल्का निकाळे संगीता सुळेभावी, मंदा दिघे ,प्रतिभा कदम, हरीश मामा, काकड भाऊ, अमोल सोनवणे, इ. भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच रेल्वे पोलिस अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी आमदार पराग शहा यांनीआपले मनोगत व्यक्त केले मला आनंद होतो की, पक्षातले सर्व कार्यकर्ते एकजुटीने काम करत आहे, येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये महायुतीच्या उमेदवाराला
प्रचंड मतांनी निवडून द्या असे आवाहन करून सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र उपाध्यक्ष मुकुंद काकड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकी मध्ये पक्ष जो उमेदवार देईन त्या उमेदवाराचे आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते वार्ड क्रमांक १२५ मधील उमेदवाराच्या खंबीरपणे पाठीशी राहू व पक्षाने दिलेली जबाबदारी आम्ही सर्व पदाधिकारी व्यवस्थित हाताळू, वार्ड क्रमांक 125 मधील सर्व नागरिकांना शासनाच्या योजनांची माहिती घरोघरी जाऊन जनजागृती करू असे वचन काकड यांनी यावेळी दिले. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते व महिला व नागरिक उपस्थित होते.