धुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा तर्कटनामा :गुजरातच्या कंत्राटदाराने निकृष्ट काम केले तरी चालेल ; सामोडे पिंपळनेर राष्ट्रीय महामार्गाच्या कामात दुय्यम सामग्रीचा वापर
धुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा तर्कटनामा :गुजरातच्या कंत्राटदाराने निकृष्ट काम केले तरी चालेल ;
सामोडे पिंपळनेर राष्ट्रीय महामार्गाच्या कामात दुय्यम सामग्रीचा वापर
साक्री प्रतिनिधी
साक्री तालुक्यातील सामोडे ते पिंपळनेर या नॅशनल हायवे 752 जी.ई.रस्त्याच्या कडेला गवारीचे नित्कृष्ट दर्जाचे काम चालु आहे. लोक प्रतिनिधी या विषयावर काहीही बोलायला तयार नाहीत. रेतीचा वापर न करता ग्रिटचा वापर करून निकृष्ट दर्जाचे सिमेंट वापर करुन काम चालु आहे. संबंधित अधिकारी धिरज पाटील यांच्याशी सामाजिक कार्यकर्ते गणेश गावीत यांनी संवाद साधला असता कामाचे इस्टिमेंन्ट (अंदाज पत्र) मध्ये संबंधित धुळे साबां अधिकारी संबंधित कामाच्या अंदाज पत्रकात ग्रिटचा वापर करता येतो असे म्हणतात. वाळूचा संबंध येत नाही. गुजरातचे ठेकेदार असल्याने महाराष्ट्रात निकृष्ट दर्जाचे कामे झाले तरी काही फरक पडत नाही.बांधकामात जर रेती नसेल आणि ग्रिटचा वापर होत असेल तर भविष्यात हे काम केव्हाही कोसळून जमिनदोस्त होईल. येथे रितसर आंधळ दळत आणि कुत्र पीठ खात असल्याने शासन स्तरावर करोड रुपये खर्च करुन कामे देत आहेत.पण ठेकेदार निकृष्ट दर्जाचे काम करुन मालामाल होत आहेत.याच्यात लोकप्रतिनिधिंचाही वाटा आहे का? असे संताप जनक प्रश्न तालुक्यातील जनता विचारत आहे.सदर काम दर्जेदार व्हावे.अन्यथा ठेकेदार, लोकप्रतिनिधी, शासन प्रशासन यांना येणा-या दिवसात जनता त्यांची जागा दाखवेल असा इशारा देऊन साक्री तालुक्यातील परिसरात असे निकृष्ट कामे चालु असतील तर कळवा असे आवाहन गणेश गावित, प्रेमचंद सोनवणे, तानाजी बहिरम आदींनी केले आहे.