वाशी नवी मुंबईच्या भाषणात काय म्हणाले जरांगे पाटील! शनिवार १२ वाजेचा अल्टीमेटम
वाशी नवी मुंबईच्या भाषणात काय म्हणाले जरांगे पाटील!
शनिवार १२ वाजेचा अल्टीमेटम
Advertisement
*७८लाख नोंदी मिळाल्याची तसेच यातील३७ लाख जणांना प्रमाणपत्र वाटप केल्याची माहिती सरकारने मनोज जरांगे पाटील यांना दिली. प्रत्येक नोंदीवर पाच जणांना जरी आरक्षण मिळालं तरी अडीच कोटी मराठ्यांना आरक्षण मिळेल असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.
*एवढं झालं तरी शिंदे समितीचं काम थांबणार नाही, ती समिती नव्या नोंदी शोधत राहणार, या समितीला दोन महिन्यांची मुदतवाढ सरकारने दिली आहे. मनोज जरांगे यांनी या समितीला एक वर्षे मुदतवाढ देण्याची मागणी केलीय, त्यामुळे ज्यांच्या नोंदी चुकून राहिल्या आहेत त्या सापडू शकतात.
*आंतरवली सराटीसह महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी मराठा समाजाच्या लोकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी सरकारने मान्य केलीय, त्याची प्रक्रिया देखील सुरु करण्यात आली आहे*
*कोर्टानं जे आरक्षण नाकारलंय ते मिळत नाही तोवर सरसकट सर्व मराठा समाजाला मोफत शिक्षण द्यावं. तसेच ते आरक्षण मिळेपर्यंत सरकारी नोकर भरती करु नये करायची असेल तर आमच्या जागा राखीव ठेवून करावी, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. त्यावर अद्याप निर्णय नाही.
*सर्वात महत्त्वाचा मुद्दा सग्यासोयऱ्यांना आरक्षण देण्याचा यावर सरकारने भूमिका मांडलेली नाही. यासंदर्भातील अध्यादेश उद्या (दि. २७ जानेवारी) दुपारी १२ वाजेपर्यंत काढावा, अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. तोवर मुंबईत जाणार नाही, आजची रात्र वाशी नवी मुंबईतच थांबणार, मात्र अध्यादेश आला नाही तर उद्या आझाद मैदानावर कुच करनार. असा इशाराही त्यांनी समाज माध्यमांसमोर बोलताना सांगितले आहे.
-कुबेर जाधव
समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटना
नाशिक
मो नंबर ९४२३०७२१०२