ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

बिल मंजुरीसाठी ५.६७ लाखांची लाच;*   *नाशिक एसीबीचा सापळा, अभियंता रंगेहात जेरबंद* . *उपविभागीय अभियंत्याकडून ३ लाख स्वीकारताना कारवाई; दुसरा आरोपी फरार, शोधमोहीम सुरू*


*बिल मंजुरीसाठी ५.६७ लाखांची लाच;*

 

*नाशिक एसीबीचा सापळा, अभियंता रंगेहात जेरबंद*

.

*उपविभागीय अभियंत्याकडून ३ लाख स्वीकारताना कारवाई; दुसरा आरोपी फरार, शोधमोहीम सुरू*

 

नाशिक | प्रतिनिधी

रस्ता डांबरीकरणाच्या कामाचे बिल मंजूर करून देण्यासाठी ५ लाख ६७ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी मोठी कारवाई केली. या कारवाईत उपविभागीय अभियंता विठ्ठल बालाजी पठाडे यांना ३ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले, तर दुसरे आरोपी कृष्णकांत देवरे हे फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.

एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या फर्मला नाशिक जिल्ह्यातील रस्ता सुधारणा व डांबरीकरणाचे सुमारे ४१ लाख रुपयांचे काम मिळाले होते. या कामापैकी सुमारे १० लाख रुपयांचे बिल प्रलंबित होते. सदर बिल मंजुरीसाठी संबंधित लोकसेवकांकडून लाचेची मागणी करण्यात आली.

Advertisement

तपासादरम्यान,

विठ्ठल बालाजी पठाडे, उपविभागीय अभियंता (वर्ग-१) यांनी ३ लाख रुपये,

तर कृष्णकांत देवरे यांनी २ लाख ६७ हजार रुपये

अशी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर सोमवारी सापळा रचण्यात आला. त्यानुसार जिल्हा परिषद परिसरात विठ्ठल पठाडे यांना ३ लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. या वेळी दुसरे आरोपी देवरे हे पसार झाले.

या कारवाईमुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या बांधकाम विभागात मोठी खळबळ उडाली आहे. प्रलंबित बिलांच्या मंजुरीसाठी लाच मागितली जात असल्याचा संशयही यामुळे अधिक गडद झाला आहे.

एसीबीचे पोलीस अधीक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *