*ई-गव्हर्नन्समध्ये नाशिक पोलीस आयुक्तालय अव्वल; राज्यात प्रथम क्रमांक* *मुख्यमंत्र्याच्या हस्ते पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केला पुरस्काराचा स्वीकार*
*ई-गव्हर्नन्समध्ये नाशिक पोलीस आयुक्तालय अव्वल; राज्यात प्रथम क्रमांक*
*मुख्यमंत्र्याच्या हस्ते पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केला पुरस्काराचा स्वीकार*
मुंबई
राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात नाशिक पोलीस आयुक्तालयाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (IPS) यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
या कार्यक्रमाचे मूल्यमापन Quality Council of India या संस्थेकडून करण्यात आले असून, नाशिकने उत्कृष्ट कामगिरी करत अव्वल स्थान मिळवले आहे.
यावेळी आपल्या भावना व्यक्त करतांना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले,
“हा पुरस्कार आम्ही एक आव्हान म्हणून स्वीकारत आहोत. या गतीला अधिक बळ देत पुढे जाण्यासाठी डिजिटल सुधारणा अधिक सखोल करू. नागरिक-केंद्रित, तंत्रज्ञानाधारित पोलिसिंगचा दर्जा सातत्याने उंचावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
तसेच त्यांनी पुढे नमूद केले,
“अजून खूप पल्ला गाठायचा आहे, पण दिशा स्पष्ट आहे.”
मुख्यमंत्री कार्यालयाचे (CMO Maharashtra) आभार मानत त्यांनी या उपक्रमामुळे राज्यातील प्रशासनात ठोस आणि मोजता येणारे परिवर्तन घडेल, असा विश्वास व्यक्त केला.
“शासक नाही सेवक ” या संकल्पनेतून नागरिकाभिमुख सेवा देण्यावर भर देत नाशिक पोलीस आयुक्तालयाने पुढील वाटचालीसाठी ठाम निर्धार व्यक्त केला आहे.



