क्राईमताज्या घडामोडी

नऊ वर्षीय बालिकेवर सत्तर वर्षाच्या नराधमाकडून अत्याचार; संशयित अटकेत


नऊ वर्षीय बालिकेवर सत्तर वर्षाच्या नराधमाकडून अत्याचार; संशयित अटकेत

 

सटाणा

 

तालुक्यातील खमताने येथे सोमवारी(दि.८) एका ७६ वर्षीय नराधमाने ९ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली.याप्रकरणी संशयित आरोपी नामदेव हरी गुंजाळ (७६,रा.खमताने) याच्याविरोधात पोलिसांनी पोस्कोसह विविध कलमांखाली गुन्ह्याची नोंद केली असून यामुळे तालुक्यात खळबळ माजली आहे.

Advertisement

तालुक्यातील खमताने येथील एका ३३ वर्षीय महिलेने याप्रकरणी सटाणा पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.फिर्यादी महिलेच्या नऊ वर्षीय मुलीस संशयित आरोपी नामदेव गुंजाळ याने गेल्या सहा महिन्यापासून ते रविवार(दि.७) दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान वेळोवेळी गावातील हनुमान मंदिरात घेऊन जाऊन आजूबाजूला कोणी नसताना तिचे कपडे काढून तिच्या छातीवर व पोटावर अंगावर हात फिरवून तसेच गल्लीत खेळत असताना पैसे व चॉकलेटचे आमिष दाखवून त्याचे घरात बोलावून तिचे कपडे काढून तिच्या छातीवर व पोटावर हात फिरवून तसेच लघवी करण्याच्या जागेवर हात फिरवून त्यामध्ये बोट घालून व तिच्या अंगावर झोपून तिच्या अंगाची मुके घेतले.याबाबत घरी कोणाला काही सांगितले तर मारून टाकण्याची धमकी दिली अशा स्वरूपाची ही फिर्याद असून पोलिसांनी संशयिताविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ६४(२)(फ), ६४(२)(म)६५(२),७४,७५, ७६,७८,३५१(२)(३)सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम ४,८,१०,१२ प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे.याप्रकरणी संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले असून बालिकेला वैद्यकीय तपासणीसाठी मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.याप्रकरणी पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत पुढील तपास करीत आहेत.या घटनेमुळे गावातील ग्रामस्थांनी तसेच पीडित मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.जमावाकडून संतप्त भावनाही व्यक्त होत्या,परंतु पोलिसांनी समयसूचकता दाखवून तात्काळ कार्यवाही करीत परिस्थिती हाताळल्याने कायदा सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न उपस्थित झाला नाही.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *