शिक्षण


*जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा ब्राम्हणवाडा येथे मोठ्या उत्साहात साजरा*

अकोले प्रतिनिधी

जिल्ह्याचे प्रेरणा स्थान माननीय  भंडारी  मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर

जिल्ह्याचे मार्गदर्शक भास्कर पाटील  शिक्षणाधिकारी (प्राथ.) जिल्हा परिषद अहिल्यानगर, तालुक्याचे दिशादर्शक  अरविंद कुमावत गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती अकोले,  राजेश पावसे  विस्तार अधिकारी बिट-ब्राम्हणवाडा केंद्रप्रमुख प्रल्हाद पवार यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ब्राम्हणवाडा येथे 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला ब्राम्हणवाडा गावातील शाळा सह्याद्री विद्यालय ब्राम्हणवाडा, श्रीम. लक्ष्मीबाई संगारे आश्रमशाळा ब्राम्हणवाडा, यशश्री किंग्स इंग्लिश स्कूल ब्राम्हणवाडा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ब्राम्हणवाडा या शाळांमधील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. दिव्यांग विद्यार्थ्यांना व सामान्य विद्यार्थ्यांना एकत्र बसवून दिव्यांग दिनाचे महत्व, सामाजिक जाणीव, शैक्षणिक स्किल्स, अध्ययन पद्धती याबाबत मान्यवरांनी माहिती दिली. यात दिव्यांगांचे पितामह म्हणून ज्यांची ओळख आहे असे लुई ब्रेल व हेलन केलर यांचा जीवनपट उलगडून सांगितला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ब्राम्हणवाडा यांनी सर्व दिव्यांग वि‌द्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप केले यातून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य झळकले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ब्राह्मणवाडा गावाचे ज्येष्ठ नागरिक व सामजिक कार्यकर्ते श्री रामभाऊ जाधव, श्री भरत आरोटे सर ब्राम्हणवाडा गावचे माजी उपसरपंच व शिक्षक मातोश्री संगारे आश्रम ब्राम्हणवाडा, श्री चव्हाण सर मातोश्री संगारे आश्रम ब्राम्हणवाडा, श्रीम. शीतल आरोटे मॅडम मुख्याध्यापिका यशश्री किंग्स इंग्लिश स्कूल ब्राम्हणवाडा, श्री. दत्तात्रय गोपाळे सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ब्राम्हणवाडा, श्री सोपान हुळवळे सर उपाध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ब्राह्मणवाडा व

Advertisement

ब्राम्हणवाडा व बेलापूर केंद्रातील दिव्यांग वि‌द्यार्थी-पालक-शिक्षक यांना मार्गदर्शन करणारे केंद्रस्तरीय विशेष शिक्षक श्री राहुल देशमुख सर हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री दत्तात्रय गोपाळे सर, प्रास्ताविक श्री राहुल देशमुख सर व आभार हे श्री सोपान हुलवळे सर यांनी केले व कार्यक्रमाची सांगता झाली.

चौकट

ऑलम्पिक स्पर्धे मध्ये जेवढे मेडल भारत देशाने जिंकले नाही त्यापेक्षा कितीतरी पट जास्त मेडल पॅराऑलम्पिक स्पर्धेत दिव्यांग खेळाडूंनी जिंकले. यातून दिव्यांग कोणत्याही क्षेत्रात कमी नाही तो नेहमी संधीच्या शोधात असतो व उत्तुंग भरारी मारतो त्यामुळे दिव्यांगाना प्रत्येक क्षेत्रात नक्की संधी द्या..राहुल देशमुख केंद्रस्तरीय विशेष शिक्षक बीट- ब्राम्हणवाडा

चौकट

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ब्राम्हणवाडा येथे जागतिक दिव्यांग दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रथमच व्यापक व्यासपीठ मिळाले आहे व त्यांना त्यांच्यातील सुप्त गुण सादर करण्यासाठी मार्गदर्शक मिळाले असून त्यामुळे दिव्यांग विद्यार्थी आनंदून गेले आहेत. आजचा कार्यक्रम अत्यंत स्तुत्य वाटला..

श्री. भारत आरोटे माजी उपसरपंच ब्राम्हणवाडा व शिक्षक मातोश्री संगारे आश्रमशाळा ब्राम्हणवाडा


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *