ताज्या घडामोडी

व्हॉईस ऑफ मीडिया’ देणार प्रशिक्षण पत्रकारिता आणि संघटनात्मक बांधणीवर दोन दिवसीय अभ्यासपूर्ण सत्रांचे शिर्डीत आयोजन राज्यभरातून सहभागी होणार व्हॉईस ऑफ मीडियाचे पदाधिकारी 


व्हॉईस ऑफ मीडिया’ देणार प्रशिक्षण

 

पत्रकारिता आणि संघटनात्मक बांधणीवर दोन दिवसीय अभ्यासपूर्ण सत्रांचे शिर्डीत आयोजन

 

राज्यभरातून सहभागी होणार व्हॉईस ऑफ मीडियाचे पदाधिकारी 

 

मुंबई (प्रतिनिधी) –

राज्यातील पत्रकारांच्या व्यावसायिक क्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशाने ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या पत्रकार संघटनेच्या वतीने दिनांक ३१ मे व १ जून २०२५ रोजी शिर्डी येथील आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल येथे दोन दिवसीय राज्यस्तरीय निवासी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. “बदलती पत्रकारिता आणि संघटनात्मक बांधणी” या मुख्य विषयाभोवती फिरणाऱ्या या कार्यशाळेत विविध क्षेत्रातील नामवंत संपादक, अभ्यासक आणि व्यावसायिक तज्ज्ञ आपले मार्गदर्शन करणार आहेत.

 

कार्यशाळेचे उद्घाटन शनिवार, ३१ मे रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यास संत परमानंद महाराज, विश्वात्मक जंगलीदास महाराज ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, ना. राधाकृष्ण विखे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि आमदार अमोल खताळ हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Advertisement

 

पहिल्या दिवशी दै. पुढारी, पुणेचे संपादक सुनील माळी हे “ग्रामीण पत्रकारिता” या विषयावर आपले विचार मांडतील. त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार संदीप वाकचौरे आणि चपराक, पुणेचे संपादक घनश्याम पाटील हे अनुक्रमे “बातमीदारी आणि साहित्य” व “पत्रकारितेचे बदलते स्वरूप” यावर सखोल मार्गदर्शन करतील.

 

दुसऱ्या दिवशी व्यावसायिक मानसिकता विकास तज्ज्ञ गगन महोत्रा, वजीर मीडिया हाऊसच्या संचालिका स्मिता गुणे व अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर नवले यांच्या सत्रांमध्ये “महिला पत्रकारिता : मार्केटिंग एक उद्योग”, “समाजाची पत्रकारितेकडून अपेक्षा” या विषयांवर विचारमंथन होणार आहे.

 

या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक प्रतिनिधीसाठी मोफत सर्व रोग निदान शिबीर आणि हेल्थ कार्ड देण्यात येणार आहे. याच कार्यशाळेदरम्यान आत्मा मलिक मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि व्हॉईस ऑफ मीडिया यांच्यातील सहकार्य कराराची औपचारिक घोषणा देखील करण्यात येईल.

 

या उपक्रमात व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रदेश अध्यक्ष अनिल मस्के, कार्याध्यक्ष अजित कुंकुलोळ, सरचिटणीस डिगंबर महाले, महिला प्रदेशाध्यक्ष रश्मी मारवाडी आणि सविता चंद्रे (ग्रामीण) यांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *