*”विकास माझे नाव !…”*
*”विकास माझे नाव !…”*
(वृक्षमित्र विष्णू वाघ)
मी विकास बोलतोय ! होय विकास बोलतोय ! प्रत्येकाला मी आता आवडतोय, लहान असो मोठा असो गरीब असो की श्रीमंत असो प्रत्येकाला माझ्याविषयी खूप आस्था वाटू लागली आहे, प्रत्येकाला मी खूप खूप आवडतोय, पण माझ्या नावाखाली खूप चुकीच्या गोष्टी सुरू आहेत कधी अंधारात तर कधी उजेडात देखील, तरी मी निमुटपणे सर्व काही सहन करतोय कारण तुम्हाला विकास हवाय ! तो विकास मिळवण्याच्या नादात नेमका विकास होतोय तरी कोणाचा ? तो कशाप्रकारे होतोय ? याचा विचारच कोणी करायला तयार नाहीये, फक्त करत राहायचं विकास.. विकास.. आणि विकास. आणि त्या विकासाच्या गप्पा मारतच मिरवत राहायचं, पण विकास खरोखर झालाय का ? की फक्त देखावा निर्माण केला आहे जसे बाहेरून पोते टणक दिसतय पण आतून भुसा तर भरलेला नाही ना याचा विचारच कोणी करत नाही पण जेव्हा केव्हा आपत्ती येथे आणि तो विकासच क्षणार्धात कोसळून पडतो तेव्हा मात्र प्रत्येक जण काही समोर येऊन काही मागे कुजबूज करत प्रश्न उपस्थित करतात, या इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होते का? पण जेव्हा निकृष्ट दर्जाचे काम होत असते तेव्हा कोणी त्यावर तक्रार करत नाही की लोकशाहीत दाबलेला साधा आवाजही उठवत नाही.
होय मी विकास बोलतोय ! आता मलाच माझी लाज वाटायला लागली आहे, सर्व काही विकास दिसतोय पण त्यात जे दडत, जे घडतं ते असं अचानक उजेडात येतं तेव्हा मात्र विकास पूर्णपणे कोसळलेला असतो, तोच विकास कधी अनेकांचा जीव घेतो तर कधी नशिबाने जीव वाचतो, पण मात्र प्रत्येकाचे डोळे उघडवतो, तेव्हा मलाच आता सांगावेसे वाटते बाबांनो तुम्हाला जे काही करायचे ते करा पण जिथे जिथे गरीब लोकांना रस्त्यावर यायची वेळ येईल अशा ठिकाणी तरी विकास, विकास दिसला नाही तरी चालेल पण त्या लोकांची सोय होईल एवढेच बघा, शेवटी काय असतं आपल्यातील श्वास जिवंत राहिला पाहिजे आणि तो श्वास जिवंत राहिला तरच मानव जात जिवंत राहील त्यासाठीच हा विकास अतिशय तळमळीने बोलतोय अंतकरणातून सांगतोय कोणतेही बांधकाम करताना स्थापत्य शास्त्रानुसार जे काही साधन संपत्ती जितक्या प्रमाणात लागते तितक्या प्रमाणात वापरा तिथे काटकसर करू नका, हवे तर रक्कम वाढवून घ्या पण आपल्या किंवा आपल्या पिढीतील आपल्या समाजातील लोकांच्या जीवावर बितेल असे काही चुकीचे कृत्य करू नका.
आज रविवार शाळेचा सुट्टीचा दिवस म्हणून इथे शाळेचे लेकरं नव्हते नाही तर ते रोज याच वेळेस असंख्य शाळेचे लेकरे असतात, लेकरे असती तर या विकासला तोंड दाखवायला कुठे जागा राहिली नसती, सगळा नशिबाचा खेळ म्हणा कुठलीच जीवितहानी आज झाली नाही म्हणून तरी या विकास वर कोणी जास्त शिंतोडे उडवले नाही जर कदाचित काही अघटीत घडले असते तर माझे आज काहीच खरे नव्हते ! विकास करून किती श्रीमंत होता यालाही कुठेतरी मर्यादा असली पाहिजे, किती पैसा आला म्हणजे तुम्ही श्रीमंत व्हाल सांगाना , संत तुकाराम महाराज यांनी त्यांच्या अभंगात छान लिहिले आहे,
नीती धर्माचे आचरण ठेवता यावे,
मुला बाळांचे रक्षण करता यावे,
आई-वडिलांची काळजी करता यावी,
अब्रूने जगता यावे,
आवडत्या व्यक्तीला वेळ देता यावा,
मन मोकळ्या मनाने गप्पा मारता याव्यात,
इतका पैसा जवळ असला की तो माणूस श्रीमंत समजावा. बस यासाठी काय धन तरी लागतं, मी विकास देखील हात जोडून जे तुकाराम महाराज यांनी सांगितले तेच पुन्हा एकदा कळकळीने सांगतोय बस इतकंच धन कमवा सारा संसार सुखी होईल.
आजची एक बस स्टॅन्ड कोसळण्याची घटना घडली उद्या दुसरी कुठली तरी होईल, रस्त्यावरचा फुल कोसळेल, कुठे शाळेचे छत कोसळेल, पण मी विकास सांगतोय असं काही घडू नये त्यासाठी प्रत्येक बांधकाम व्यवसाय काने काळजी घ्या, इंग्रज भारतात आले आणि गेले त्यांचे कुठले गुण घ्यायचे कुठले नाही घ्यायचे हा प्रत्येकाचा प्रश्न पण एक गुण त्यांच्याकडून नक्की घ्या त्यांनी केलेले बांधकाम आज शंभर दीडशे वर्षानंतरही त्यांनी बांधलेले जसेच्या तसे आहेत कुठलाही पूल पडत नाही , कुठलाही बंधारा फुटत नाही, कुठलीही इमारत आजही पडत नाही, कुठेतरी नीतिमत्ता जागी करा, आपण माणूस आहोत बुद्धिशाली प्राणी आहोत हे विसरू नका, हा विकास कोणाच्याही विरुद्ध बोलत नाही त्याची तळमळ एकच आहे फक्त आपल्या चुकीमुळे कुणाचे तरी जीव जाऊ नये काही वर्षातच बांधकाम पडू नये बाकी सर्व समजदार आहातच तरीही मी विकास आपला विकास करण्यास कटिबद्ध आहे, मलाही बोलायला जास्त आवडत नाही पण काय करणार जेव्हा दृश्य बघतो तेव्हा आपोआप माझ्या हृदयातून कंठ फुटतो आणि आपल्याला हात जोडून विनवणी करावीच वाटली. या विकासची आपल्या सर्वांना हात जोडून विनंती बाबांनो सुधरा, संघटित व्हा, समाज विघातक काम होणार नाही याची काळजी घ्या थांबतो.
✍️ वृक्षमित्र विष्णू तानाजी वाघ
अध्यक्ष, वृक्षमित्र फाऊंडेशन व
वृक्षमित्र साहित्य परिषद,सिन्नर.
(दोडी बू ll)
(७०२०३०३७३८)



