*संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या खाजगी वाहनांसाठी वाहतूक मार्गात बदल*
*संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या खाजगी वाहनांसाठी वाहतूक मार्गात बदल*
त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी
संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त १४ जानेवारी २०२६ रोजी त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन नाशिक ग्रामीण पोलिसांकडून विशेष वाहतूक नियोजन व रस्ता वळविण्याचा (Road Diversion) निर्णय घेण्यात आला आहे.
दरवर्षीप्रमाणे नाशिक जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांतून हजारो भाविक त्र्यंबकेश्वर येथे दाखल होत असल्याने शहरात वाहतूक कोंडी होऊ नये, तसेच भाविकांना सुरक्षित व सुरळीत प्रवास करता यावा, या उद्देशाने ही खबरदारी घेण्यात आली आहे.
खाजगी वाहनांसाठी पर्यायी मार्ग
दि. १३/०१/२०२६ रोजी सकाळी ७.०० वाजल्यापासून ते दि. १५/०१/२०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत नाशिकहून त्र्यंबकेश्वरकडे जाणारी सर्व प्रकारची खाजगी वाहने (महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस, रुग्णवाहिका व शासकीय वाहने वगळून) पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहेत.
Advertisement*नाशिक → त्र्यंबकेश्वर (खाजगी वाहने – पर्यायी मार्ग):*
गोवर्धन – गिरणारे – धोंडेगाव – देवरगाव – वाघेरा फाटा – अंबोली फाटा – सापगाव – त्र्यंबकेश्वर
त्र्यंबकेश्वरहून नाशिककडे वाहतूक
त्र्यंबकेश्वर येथून नाशिककडे जाणारी खाजगी वाहने पूर्वीच्या मार्गानेच चालू राहतील.
त्र्यंबकेश्वर → नाशिक (एकेरी मार्ग):
त्र्यंबकेश्वर – पेगलवाडी फाटा – खंबाळे – संदीप फाउंडेशन – पिंपळगाव बहुला – नाशिक
*पोलिसांचे आवाहन*
ही वाहतूक व्यवस्था पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण बाळासाहेब पाटील व अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून, याबाबत स्वतंत्र अधिसूचना जारी करण्यात आली आहे. नागरिकांनी व भाविकांनी पोलिसांना सहकार्य करून दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन नाशिक ग्रामीण पोलिसांकडून करण्यात आले आहे.



