अपघात एक ,धागे अनेक! तपासाने उलथवला अपघाताचा दावा; खुनाचा गुन्हा सिद्ध;
अपघात एक ,धागे अनेक!
तपासाने उलथवला अपघाताचा दावा; खुनाचा गुन्हा सिद्ध;
त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत वर्षभरापूर्वी अपघात म्हणून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास करताना तो अपघात नसून पूर्ववैमनस्यातून नियोजनपूर्वक करण्यात आलेला खून असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. या प्रकरणात सराईत गुन्हेगार युवराज मोहन शिंदे (वय ३९) यास पोलिसांनी अटक केली आहे.
त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २०८/२०२४ अन्वये भा.न्या.सं. कलम २८१, १०६(१), ३२४(४)(५) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ रोजी अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, वाहन हालचालींचे विश्लेषण व शस्त्रसाठ्याच्या तपासातून हा प्रकार अपघात नसून मयत विष्णू गांगुर्डे यांचा पाठलाग करून मोटार कारने धडक देत खून केल्याचे निष्पन्न झाले.
*शस्त्रसाठा व चोरीची दुचाकी हस्तगत*
तपासादरम्यान आरोपीकडून कोयता, चॉपर, आधुनिक धनुष्यबाण तसेच पिंपळगाव पोलीस स्टेशन गु.र.क्र. ३४६/२०२४ मधील चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली. त्याआधारे त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गु.र.क्र. ०१/२०२६ अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ तसेच मुंबई पोलीस कायदा कलम ३७(१)(३) प्रमाणे स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला.
यानंतर सदर प्रकरणात भा.न्या.सं. कलम १०३(१) (खून) लावून आरोपी युवराज शिंदे यास अटक करण्यात आली.
आरोपीचा भीषण गुन्हेगारी इतिहासआरोपी युवराज शिंदे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर नाशिक जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामध्येवाडीव-हे पो.स्टे – चोरीसातपूर पो.स्टे – दरोडा, अपहरण, मारहाण, धमकीत्र्यंबकेश्वर – प्राणघातक हल्लासरकारवाडा – दरोडा, पुरावे नष्ट करणेगंगापूर – मारहाणतसेच आळेफाटा (पुणे) येथे दाखल खुनाच्या गुन्ह्यात तो पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या आदेशानुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तपास पथकात पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी,
सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गावित,पोउनि देवरे,
पोह. सचिन जाधव, गंगावणे,मपोह योगिता बोरील,
पोशि प्रदीप राठोड, भारत भावले, नंदकुमार मुसळे यांचा समावेश होता.

