ताज्या घडामोडी

* *सह्याद्री युवा मंच तर्फे महिलांसाठी मोफत गृह उद्योग कार्यशाळा शुभारंभ *


* *सह्याद्री युवा मंच तर्फे महिलांसाठी मोफत गृह उद्योग कार्यशाळा शुभारंभ *

सिन्नर प्रतिनिधी 

Advertisement

सह्याद्री युवा मंच सिन्नर आयोजित संस्थापक अध्यक्ष युवा नेते उदय सांगळे व माझी जिल्हा परिषद अध्यक्ष शितलताई सांगळे यांच्या मार्गदर्शनाने सिन्नर येथे तीन दिवसीय मोफत महिला गृह उद्योग प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली असुन आज मान्यवरांच्या हस्ते शुभरंभ करण्यात आला.जिल्हा परिषद माजी अध्यक्षा शितल सांगळे यांनी सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले महिलांचे स्वावलंबन व्हावे व सुखी कुटुंबाचे भविष्य सुधरावे यासाठी महिला आर्थिक सशक्तिकरण गरजेचे आहे यात चांगल्या उद्देशाने युवा नेते उदय सांगळे यांनी महिलांसाठी छोट्या व्यवसायातून अर्थाजन होऊन कुटुंबाला हातभार लाभेल, महिला स्वतः व्यवसाय करून स्वतःच्या पायावर उभ्या राहतील येणाऱ्या सणासुदीच्या काळासाठी आज घेतलेले प्रशिक्षण मोती ज्वेलरी सेट, गृह सजावट वस्तू, बेलमाळ, हँगिंग लोटस ,हँगिंग शोपीस, तोरण, विविध प्रकारच्या बनवण्याचे प्रशिक्षण प्रात्यक्षिकांद्वारे प्रशिक्षितांमार्फत दिले जाईल जाईल या प्रशिक्षणासाठी सुमारे 3000 महिलांनी नोंद केली आहे प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना या कार्यशाळेत सर्व वस्तू बनवण्याचे संपूर्ण प्रशिक्षण मोफत देणार असून त्यासाठी लागणारे साहित्य आयोजंकातर्फे मोफत पुरवले जाणार आहे. तसेच सह्याद्री युवा मंच तर्फे भाग घेणाऱ्या सर्व महिलांना प्रमाणपत्र भेटवस्तु देण्यात येणार आहे . इत्यादी माहिती देऊन आलेल्या भगिनींचे स्वागत केले प्रमुखातिथी सुनीताताई लोखंडे यांनी मनोगत व्यक्त करताना सह्याद्री युवा मंच या संस्थेतर्फे वर्षभर अनेक समाज उपयोगी कार्यक्रम होत असतात दोन महिन्यापूर्वी घेतलेला खेळ पैठणीचा कार्यक्रम अत्यंत प्रतिसाद देणारा ठरला युवा नेते उदय सांगळे व माझी जी उपाध्यक्ष शितल सांगळे ही जोडगोळी नेहमी सर्वसामान्यांची कामे करत असतात. पुरुषांसाठी बरेच कार्यक्रम होतात परंतु महिलांसाठी सह्याद्री युवा मंच यांनी नवीन व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे याबद्दल त्यांचे व सह्याद्री युवा मंचचे अभिनंदन केले .युवा नेते उदय सांगळे यांनी सह्याद्री युवा मंच अंतर्गत युवकांसाठी करिअर मार्गदर्शन अपंगांसाठी विविध कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा खेळाडूंसाठी कुस्ती कबड्डी व विविध स्पर्धा, क्रीडा शिबिर, महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम घेत असतो महिलांसाठी होणाऱ्या या उद्योग कार्यशाळेच्या शिबिराची नवीन संकल्पना महिलांना रोजगार व आर्थिक सक्षमीकरणासाठी उपयोगी पडेल. आपण यापुढेही समाज उपयोगी कामांसाठी सदैव तत्पर राहू असे आश्वासन दिले . मुंबई येथील महिला प्रशिक्षकांद्वारे सदर महिलांना संपूर्ण प्रशिक्षण देण्यात आले . प्रमुख उपस्थितांमध्ये तेजस्विनी वाजे, सुलोचना चव्हाणके, रोहिणी मोरे, सुनीता लोखंडे, ज्योती वामने, सुजाता तेलंग ,,सुजाता सांगळे, मीनाक्षी दळवी ,रूपल डिंगोरे ,प्रमिला सरवार. आदींसह महिला उपस्थित होत्या .तसेच पुढील दोन दिवस 17 ऑगस्ट रोजी ज्वाला माता लॉन्स 18 आँगस्ट रोजी शिंपी देवी मंदिर येथे सदर कार्यशाळा सकाळी 11 ते 4 या वेळेत आयोजित केले आहे .तरी जास्तीत जास्त महिलांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शितल सांगळे यांच्यातर्फे करण्यात आले आहे.*


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *