अमृतवाहिनी शिक्षण संस्थेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा अमृतवाहिनीच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे संगमनेरचे मोठे नाव- डॉ. हेमलता पाटील
अमृतवाहिनी शिक्षण संस्थेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा
अमृतवाहिनीच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे संगमनेरचे मोठे नाव- डॉ. हेमलता पाटील
संगमनेर (प्रतिनिधी)–
अमृत उद्योग समूहाचे संस्थापक स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांनी स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान दिले. स्वातंत्र्य सैनिकाचा हाच वारसा घेऊन लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी राज्याच्या विकासात मोठे योगदान दिले असून अमृतवाहिनीच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रणालीमुळे संगमनेरचा राज्यभरात लवकर निर्माण झाले असल्याचे प्रतिपादन राज्य काँग्रेसच्या सचिव डॉ. हेमलता पाटील यांनी केले आहे.
अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने मेधा मैदानावर 78 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी संस्थेच्या विश्वस्त सौ शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, अकॅडमी डायरेक्टर डॉ. जे. बी. गुरव, प्राचार्य डॉ एम ए व्यंकटेश, व्यवस्थापक प्रा. व्ही.बी. धुमाळ, डॉ मच्छिंद्र चव्हाण, डॉ मनोज शिरभाते , डॉ. राजेंद्र वाघ, डॉ. बी एम लोंढे, सौ जे. बी. सेट्टी, शितल गायकवाड अंजली कन्नावार, विलास भाटे, प्रा.जी.बी. काळे, प्रा विजय वाघे ,नामदेव गायकवाड, प्रा. जी.बी. बाचकर, प्रा. बाळासाहेब शिंदे ,डॉ. सुनील सांगळे आधी सर्व विभाग प्रमुख शिक्षक उपस्थित होते.
यावेळी डॉ हेमलता पाटील म्हणाल्या की, शिक्षणामुळे हा परिसर समृद्ध झाला आहे. संगमनेर चे नाव आज राज्यामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे केंद्र म्हणून घेतले जात आहे. सहकारामुळे या तालुक्यात मोठा विकास झाला असून आ. बाळासाहेब थोरात यांनी शिक्षण सहकार कृषी समाजकारण या सर्व क्षेत्रांमध्ये मोठे काम केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात यशवंतराव चव्हाण यांचे वारसदार म्हणून आमदार थोरात यांचा आवर्जून उल्लेख केला जात असून संगमनेरला त्यांनी विकासाची नवी दिशा दिली आहे
देश आज वेगळ्या वळणावरून जात असून सर्वांनी लोकशाही व देशाची एकता राखण्यासाठी काम करावे. अनेक गुणवंत विद्यार्थी हे परदेशात काम करण्यास उत्सुक असून आपली कार्यक्षमता ही देशाच्या विकासासाठी वापरावी असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी सुरक्षा अधिकारी नरेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा जवानांचे पथक व एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांना सुंदर परेड करून मानवंदना दिली.
नामदेव कहांडळ यांनी सूत्रसंचालन केले तर बाळासाहेब शिंदे यांनी आभार मानले यावेळी सर्व विभागांचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.