*सृदुढ महीला कुटुंबाचे उज्वल भविष्य घडविते : डॉ. वैष्णवी चव्हाणके*
*सृदुढ महीला कुटुंबाचे उज्वल भविष्य घडविते : डॉ. वैष्णवी चव्हाणके*
सिन्नर :
मालपाणी उद्योग समुह संगमनेर, रोटरी क्लब ऑफ गोंदेश्र्वर सिन्नर व कामगार कल्याण मंडळ नाशिक यांचे संयुक्त विद्यमाने मालपाणी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज संगमनेर येथे महिलांचे आरोग्य या विषयावर मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते.
डॉ. वैष्णवी शुभम चव्हाणके यांच्या मार्गदर्शनाने किशोवयीन मुली व महिलांच्या आरोग्याच्या समस्या तसेच त्यांच्यात वाढत्या वयानुसार होणारे शारीरिक व मानसिक बदल या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
डॉ. वैष्णवी चव्हाणके नेहे यांनी आपल्या मार्गदर्शनातून किशोरवयीन मुलींची शारीरिक व मानसिक समस्या, आई वडील व नातेवाईकांचा त्यांच्या या वयात जीवनातील सहभाग, परिस्थितीची जाणीव, आरोग्य विषयक सवयी, त्वचेची काळजी, पाणी पिण्याचे महत्त्व, वैचारिक पातळी, किशोर वय होणारे बदल याविषयी मार्गदर्शन करताना यावर रामबाण उपाय म्हणजे पूरक आहार योग्य पुस्तकांचे वाचन आणि चांगल्या सवयी याविषयी जागृती केली. निरोगी आरोग्य हे कुटुंबाचे उज्वल भविष्य घडविते, आजारांपासून व दवाखान्यापासून जे कुटुब दुर आहे तेच कुटुब खरे सुखी कुटुब आहे.
याप्रसंगी मालपाणी उद्योग समूहाच्या संचालिका रचना मालपाणी, राष्ट्रिय सचिव अखिल भारतीय सैनी समाज सुजाता इलवे, सहाय्यक कल्याण आयुक्त कामगार कल्याण मंडळ नाशिक भावना बच्छाव , अनेस्थेसियोलॉजिस्ट मेडीकव्हर हॉस्पिटल संगमनेर डॉ रुपाली शिंदे व महिला उपस्थित होत्या.