संगमनेर तालुका भाजपा कार्यकारिणी सचिव पदी प्रियांकाताई जाधव यांची नियुक्ती
संगमनेर तालुका भाजपा कार्यकारिणी सचिव पदी प्रियांकाताई जाधव यांची नियुक्ती
अहमदनगर /प्रतिनिधी
येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुक होऊ घातली आहे. याचं पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाच्या वेगवान हालचाली होताना दिसून येत आहे.लोकसभा निवडणूकी पूर्वी सर्वच पक्षांनी आपल्या पक्षाच्या नवकार्यकारणी जाहीर करत नव्या चेहऱ्यांना संधी दिलीय.
अशातच संगमनेर तालुका भाजपा पक्षाची कार्यकारणी आज भाजपा तालुका अध्यक्ष वैभव लांडगे यांनी जाहीर केलीय. यावेळी त्यांनी या कार्यकारणीत तरुण कार्यकर्त्यांना मोठी संधी उपलब्ध करून दिल्याने कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष व्यक्त केलाय.
संगमनेर तालुक्यातील पठार भागातील साकुर गावच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ.प्रियांकाताई सहदेव जाधव यांना मोठी जबाबदारी दिली गेलीय. सौ.प्रियांकाताई जाधव यांची संगमनेर तालुका सचिव पदी नियुक्ती करण्यात आलीय.
साकुर पठार भागातील सामाजिक कार्यकर्त्या तर भाजप पक्षाचे निष्ठावान व्यक्तिमत्त्व तर विखे पाटील यांचे परिवाराचे कट्टर समर्थक,सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या प्रियांकाताई जाधव यांनी विवीध सामजिक कार्यात स्वतः ला झोकून महिलांची मोठी फळी उभी केलीय.तर सत्याच्या बाजूने कायम उभे राहत. अन्यायविरुद्ध न्याय मिळवून देण्याची त्यांची ठाम भूमिका अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या या निवडीचे संगमनेर तालुक्यासह साकुर पठार भागातून मोठ्या प्रमाणात अभिनंदन व्यक्त करत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सौ.प्रियांकाताई सहदेव जाधव या भाजपचे निष्ठावान महिला नेत्रुत्व पुढे येत असल्याने मोठा आनंद व्यक्त केला जात आहे. त्यांचे राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान आहे.त्यांचे राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय दादा विखे पाटील, शालिनीताई विखे पाटील, वैभवजी लांडगे, अमोल खताळ, बाळासाहेब खेमनर, बुवाजी खेमनर, इसाक पटेल, मन्सूर पटेल, दादा पटेल, मछिंद्र खेमनर , विकास पवार , भिमराज जाधव,सामाजिक कार्यकर्ते सुनील इघे आदींनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.