सिंहस्थ कुंभमेळ्यात राष्ट्रीय महामार्ग क्र.३ #कोकणगाव ते #कसबे_सुकेणे रेल्वे स्टेशन जोडरस्ता व #खेरवाडी रेल्वे स्टेशन ते पिंपरी सैय्यद आडगाव रस्ता मंजूर
सिंहस्थ कुंभमेळ्यात राष्ट्रीय महामार्ग क्र.३ #कोकणगाव ते #कसबे_सुकेणे रेल्वे स्टेशन जोडरस्ता व #खेरवाडी रेल्वे स्टेशन ते पिंपरी सैय्यद आडगाव रस्ता मंजूर
नाशिक –त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर #निफाड तालुक्यातील महत्त्वाकांक्षी अशा रु.३८ कोटींच्या विकास कामांना मंजुरी मिळालेली असून निविदा प्रक्रिया पूर्ण करून लवकरच कामास सुरुवात होणार आहे.
नाशिक –
त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातून, विशेषत: उत्तर भारतातून भाविक मोठ्या प्रमाणावर नाशिकमध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे निफाड तालुक्याला विशेष महत्त्व प्राप्त होत आहे. निफाड तालुक्यात मध्य रेल्वेचा असलेला मुख्य मार्ग, तीन रेल्वे स्टेशनची सुविधा, राष्ट्रीय महामार्ग क्र.३ व छत्रपती संभाजीनगर ते नाशिक हे महामार्ग. कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांची ये-जा प्रामुख्याने निफाड तालुक्यातील मध्य रेल्वेच्या लासलगाव, निफाड (कुंदेवाडी), कसबे सुकेणे व नारायणगाव (खेरवाडी) या रेल्वे स्टेशनवरून होणार आहे. तर वाहनाद्वारे राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ व छत्रपती संभाजीनगर या महामार्गावरून ये-जा होणार आहे. तर वाहन पार्किंग देखील असणार आहे.
निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे व नारायणगाव (खेरवाडी) या रेल्वे स्टेशनवर कुंभमेळा रेल्वेला थांबा मिळालेला असून याठिकाणी विविध विकास कामे सुरु आहे. तर या रेल्वे स्टेशनवरून बसने प्रवाशांना नाशिक येथे ये-जा करणेकरिता आवश्यक असलेल्या रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण करण्यात येत आहे. त्यांतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्र.३ कोकणगाव ते कसबे सुकेणे रेल्वे स्टेशन या ११ कि.मी. जोडरस्त्यासाठी रु.२६ कोटी व नारायणगाव (खेरवाडी) ते पिंपरी सैय्यद – आडगाव जोड रस्त्यास १२ कोटी असे एकूण रु.३८ कोटी मंजूर करण्यात आले आहे. यात खालीलप्रमाणे कामे होणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र.३ कोकणगाव ते कसबे सुकेणे रेल्वे स्टेशन ११ कि.मी.
✔ कोकणगाव (स्टॅन्ड) ते कोकणगाव या लांबीत १० मी. रुंदीकरण व काँक्रीटीकरण
✔ कोकणगाव ते कसबे सुकेणे या दरम्यानच्या लांबीत ७ मी. रुंदीकरण व डांबरीकरण
✔ कसबे सुकेणे या गावातील लांबीत १० मी. रुंदीकरण व काँक्रीटीकरण
✔ कसबे सुकेणे गाव ते रेल्वे स्टेशन या दरम्यानच्या लांबीत ७ मी. रुंदीकरण व डांबरीकरण
✔ मटाले मंगल कार्यालयाजवळ असलेल्या अस्तित्वातील ओहोळातील पाईप मोरी हटवून नवीन स्लॅब ड्रेनचे बांधकाम
✔ कोकणगाव येथे स्वतंत्र बसथांबा व स्वच्छतागृह बांधकामनारायणगाव (खेरवाडी) ते पिंपरी सैय्यद – आडगाव जोड रस्ता ५ कि.मी.
✔ खेरवाडी रेल्वे स्टेशन ते दात्याने ओम शांती रस्त्याने – ओणे कसबे सुकेणे रस्त्यापर्यंत ६०० मी. लांबीत ७ मी. रुंदीकरण व कॉंक्रिटीकरण
✔ दात्याने रस्ता ते खेरवाडी पिंपरी सैय्यद आडगाव या दरम्यानचे मार्गाचे ७ मी. रुंदीकरण व डांबरीकरण
✔ पिंपरी सैय्यद येथे स्वतंत्र बसथांबा व स्वच्छतागृह बांधकाम
भाविकांना सुकर, सुरक्षित व सुलभ वाहतूक व्यवस्था मिळावी यासाठी रेल्वे स्थानकांचा दर्जा उंचावणे, रस्त्यांचे रुंदीकरण-मजबुतीकरण आणि सोईसुविधांचा विकास यासंदर्भात महाराष्ट्र शासन व कुंभमेळा प्राधिकरणाकडे करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर वरीलप्रमाणे महत्त्वाच्या कामांना मंजुरी मिळाली असून लवरकरच प्रत्यक्षात कामांना सुरुवात झाली आहे.



