निसाका विक्री : फसवे आमदार आणि गद्दार राजकारण!
निसाका विक्री : फसवे आमदार आणि गद्दार राजकारण!
निफाड सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीप्रकरणात खरी लढाई शेतकऱ्यांची आहे आणि त्याच शेतकऱ्यांच्या मतांच्या बिदागीवर निवडून आलेले आमदार फसवे निघाले असं काहीसं वातावरण आज निसाकाच्या कार्यक्षेत्रात निर्माण झालंय.
तर हा मुद्दा तेंव्हा ऐरणीवर आला जेंव्हा निसाका कारखान्याच्या विक्रीची निविदा चर्चेत आली, त्यानंतर शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना तातडीचे पत्र लिहून निफाड सहकारी साखर कारखाना विक्री प्रक्रियेला स्थगिती द्यावी अशी केल्याची वार्ता पसरली. त्यानंतर लगेचच या विक्री प्रक्रियेला स्थगिती मिळाली असा संदेश झपाट्याने व्हायरल झाला. ही चुगली आमदारांच्या गोटातून झाली असाही एक मत प्रवाह पाठोपाठ व्हायरल झाला.आणि इथेच कारखाना बचाव गट आणि आमदार गट समाजमाध्यमांवर समोरासमोर येऊन कुरघोडी सुरु झाली.
निसाका विक्री निविदा प्रक्रियेला विरोध करण्यासाठी माजी आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वात आज मोर्चाचे आयोजन करण्यात आला असतांना आमदारांनी हा मोर्चा हाणून पडण्यासाठी लोकांसमोर मोठ्या अभिमानाने जाहीर केलं – “निसाकाच्या विक्रीला स्थगिती मिळाली. असा खोटा प्रचार केल्याचा आरोप अनिल कदम आणि निसाकाचे सभासद करीत आहेत.
अनिल कदम यांनी जिल्हा बँकेचे प्रशासकीय बिडवई आणि निफाडचे प्रांत शशिकांत मंगरुळे यांना कॉन्फरन्स कॉलवर चर्चा करून खरी वस्तुस्थिती समोर आली आहे. प्रशासक बिडवई यांनी थेट सांगितलंय की अशी कोणतीही स्थगिती मिळालेली नाही.आणि इथेच आमदार महोदयांचा कथित दावा खोटा ठरला आणि तेही सपशेल तोंडावर आपटले.
सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कामगार यांच्या डोळ्यात धूळफेक करून आमदार साहेब आपली राजकीय दुकानदारी चालवतायत. हे नेमकं काय? शेतकऱ्यांची थट्टा की गद्दारी?असा सवाल सभासद शेतकरी विचारू लागलेत.
निसाका संघर्ष समिती आणि कामगार संघटना आज विराट मोर्चा काढतायत. शेतकरी एकदिलानं रस्त्यावर उतरणार आहेत. आणि याच मोर्चाचं गांभीर्य कमी करण्यासाठी “स्थगिती मिळालीये” अशी बिनबुडाची अफवा पसरवली जातेय. हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांच्या लढ्याला पाठीमागून वार करण्यासारखा आहे
आज अचानक शेतकऱ्यांच्या काळजीत पडलेले काही “नेते” खरं तर इतके दिवस गप्प का होते? कारखाना बुडत असताना, कामगारांची थकबाकी वाढत असताना, सभासदांवर कर्जाचे ओझे पडत असताना हेच लोक कुठे होते? आता पोटशूळ का उठला ?
खरी ताकद असेल तर दिल्ली-मुंबईत जाऊन आवाज उठवा!
निसाका विक्री कायमची रद्द करा.
गैरव्यवहार करणाऱ्यांना तुरुंगात टाका.
ते झालं की मग करा शेतकरीहिताच्या गोष्टी!असे थेट आव्हानच निसाका संघर्ष समिती आणि सभासदांनी आमदार आणि त्यांच्या बगलबच्च्यांना दिलंय.
खोटं बोलणारे आमदार, अफवा पसरवणारे नेते,
आणि गद्दार राजकारण करणाऱ्या मंडळीना निसाका कधीच विसरणार नाही.निसाका हा फक्त कारखाना नाही… तो शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे.
म्हणूनच मोर्चात उमटणारा आवाज “निसाका वाचवू, गद्दार हाकलू!”
“फसव्या आमदारांना जनता माफ करणार नाही!हाच असेल.
आमदार महोदय, शेतकऱ्यांना किती काळ फसवणार?
मग हा खोटेपणा कशासाठी? सभासद आणि शेतकऱ्यांना मूर्ख समजून खेळ मांडायचा, एवढंच ना?असा सवाल हा मोर्चा विचारेल.
अनिल कदम, खंडू बोडके पाटील यांच्यासारखे नेते थेट संघर्ष समितीच्या पाठीशी उभे राहून “मोर्चा होणारच” असं सांगतायत. पण आमदार महोदय, तुम्ही मात्र उलट दिशेने पळ काढतायत. खोटं पसरवून मोर्चा कमकुवत करण्याचं राजकारण म्हणजे शेतकऱ्यांच्या पोटावर लाथ आहे.अशा सभासद शेतकऱ्यांच्या भावना आहेत.
आजपर्यंत निसाकाच्या तबाहीवर डोळेझाक करणारे नेते आता अचानक शेतकऱ्यांच्या काळजीत कसे पडले? खऱ्या अर्थाने काळजी असेल तर दिल्ली-मुंबईच्या दरबारात जाऊन निसाका विक्री कायमची रद्द करून दाखवा! ज्यांनी कारखान्याचं राजकारण केलं, गैरव्यवहार केले, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून दाखवा!
आमदार साहेब, शेतकऱ्यांच्या घामावर उभ्या असलेल्या कारखान्याबाबत खोटं बोलणं, अफवा पसरवणं, हा तुमचा राजकीय “धंदा” चालेल कदाचित… पण शेतकरी याला बळी पडणार नाही.
निसाका हा कारखाना नाही, तर शेतकऱ्यांची ओळख आहे.
ही ओळख विक्रीच्या जाळ्यात गंडवू देणार नाही.
उद्या मोर्चात हजारोंच्या संख्येने शेतकरी जमले तर त्यात एकच आवाज दुमदुमेल,
“निसाका वाचवा – खोटं बोलणाऱ्या नेत्यांना घर बसवा!”हाच या मोर्चाचा संदेश असेल.
……….
-दुनियादारी wont lie